Friday, June 28, 2024

/

बेळगाव जिल्ह्यावर जारकीहोळींचे वर्चस्व सिद्ध!

 belgaum

बेळगाव लाईव्ह विशेष: कर्नाटकाच्या राज्यपातळीवरील राजकारणासह बेळगाव जिल्ह्याच्या राजकीय पटलावर महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या जारकीहोळी कुटुंबाचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. चिकोडी लोकसभा मतदार संघातून मंत्री सतीश जारकीहोळी यांची कन्या प्रियांका जारकीहोळी यांची खासदारपदी वर्णी लागली असून या मतदार संघातून दोनवेळा खासदारपदी निवडणूक आलेले भाजपचे अण्णासाहेब जोल्ले यांचा मतांच्या मोठ्या फरकाने पराभव झाला आहे.

दुसरीकडे बेळगाव लोकसभा मतदार संघात देखील रमेश जारकीहोळी त्यांच्या विशेष प्रयत्नातून निवडणूक रिंगणात उतरविले माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांचाही मोठ्या फरकाने विजय झाला असून या वरून पुन्हा एकदा राजकारणातील आणि विशेषतः बेळगाव जिल्ह्यावरील जारकीहोळी बंधूंचे वर्चस्व अधोरेखित झाले आहे.

चिक्कोडी लोकसभा मतदार संघात काँग्रेसमधून राजकारणात नवख्या असलेल्या प्रियांका जारकीहोळी यांना उमेदवारी देण्यात आली. राज्याच्या राजकारणात आणि यमकनमर्डी विधानसभा मतदार संघावर मजबूत पकड असणाऱ्या, तसेच जिल्हा पातळीवरील राजकारणात किंगमेकर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सतीश जारकीहोळी यांच्या अनुभवातून राजकारणात प्रवेश घेतलेल्या प्रियांका जारकीहोळी यांचा विजय हा मोठा आहे. देशभरात कमी वयात खासदारपदी वर्णी लागणाऱ्या काही मोजक्या खासदारांमध्ये प्रियांका जारकीहोळी  यांची गणना होणार असून ८६ हजार हुन अधिक मतांच्या फरकांनी त्यांनी दोनवेळा खासदारपद भूषविणाऱ्या अण्णासाहेब जोल्ले यांचा पराभव केला आहे.

 belgaum

SAtish vs ramesh

यापूर्वी देशात ओडिशा मधील चंद्राणी मुर्मू या महिला खासदारांची अत्यंत कमी वयात म्हणजेच वयाच्या २५व्या वर्षी संसदेत वर्णी लागली असून बहुतेक त्यांच्यानंतर कर्नाटकातील, बेळगावमधील प्रियांका जारकीहोळी यांची वयाच्या २७ व्या वर्षी खासदारपदी निवड झाल्याने त्या देशातील सर्वात कमी वयात खासदारपदी निवड झालेल्या दुसऱ्या महिला खासदार ठरण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे बेळगाव लोकसभा मतदार संघात बाहेरून आयात केलेले उमेदवार जगदीश शेट्टर यांना सुरुवातीपासूनच विरोध होत असूनही, बेळगावमधील स्थानिक भाजप नेते आणि कार्यकर्त्यांचा विरोध असूनही केवळ रमेश जारकीहोळी यांच्या शब्दावर उमेदवारी मिळवून निवडणूक लढविले जगदीश शेट्टर हेदेखील तब्बल १ लाख ७७ हजार मतांच्या फरकाने विजयी झाले आहेत. आयात, परप्रांतीय आणि बाहेरचा उमेदवार असा ठपका असूनही भरघोस मताधिक्क्याने शेट्टर यांनी विजय मिळविला असून यामागे रमेश जारकीहोळी यांचे प्रयत्न कामी आले आहेत.

दोन्ही  मतदार संघातील उमेदवारांची झालेली निवड, निवडणूक प्ररकियेदरम्यान झालेल्या घडामोडी आणि जारकीहोळी कुटुंबाचा पाठिंबा असलेले उमेदवार विजयी होणे हि बाब लक्षात घेता बेळगाव जिल्ह्यावर जारकीहोळी कुटुंबाची असलेली पकड किती मजबूत आहे हेच सिद्ध होते.

 या अगोदर विधानसभा आणि विधान परिषदेत गेलेल्या जारकीहोळी कुटुंबातील प्रियांका जारकोहोळी  या पहिल्या व्यक्तीच्या लोकसभेत प्रवेश करणार आहेत. भाजपमधून रमेश जारकीहोळी आणि भालचंद्र जारकीहोळी हे बंधू भाजपकडून  विधान सभेत आमदार आहेत तर विधान परिषदेत लखन जारकीहोळी आणि काँग्रेसकडून सतीश जारकीहोळी विधानसभेत आमदार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.