Wednesday, December 25, 2024

/

बेळगाव साठी रेल्वेच्या कोणत्या प्रस्तावावर झाली चर्चा?

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव लोकसभा मतदार संघाच्या खासदारपदी निवड झाल्यानंतर नवनिर्वाचित खासदार जगदीश शेट्टर यांनी दिल्ली येथील शपथविधी आटोपल्यानंतर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन रेल्वे प्रकल्पाच्या महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा केली. बेळगावमधील प्रलंबित रेल्वे प्रकल्प लवकरात लवकरपूर्ण करून नव्या मागण्या पूर्ण करण्याची विनंती केली आहे.

केंद्रीय मंत्र्यांसमवेत झालेल्या चर्चेत बेळगाव – कित्तूर – धारवाड मार्गासाठी नवीन रेल्वे प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्याचे आवाहन खास. शेट्टर यांनी केले असून दोन वर्षांपूर्वी भूसंपादनाचे प्रस्ताव सादर करण्याची प्रक्रिया पार पडल्यानंतरही राज्य सरकारने रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांना एकही जमीन हस्तांतरित केलेली नाही.

बेळगाव-कित्तूर-धारवाड नवीन रेल्वे प्रकल्प अंमलबजावणीसाठी आवश्यक आहे अशी माहिती केंद्रीय मंत्र्यांना खासदारांनी दिली. या प्रकरणाचे पुनरावलोकन करण्याची विनंती करून कर्नाटक राज्य सरकारला प्रकल्पाची जलद अंमलबजावणी सुलभ करण्यासाठी दक्षिण पश्चिम रेल्वे- हुबळीच्या अधिकाऱ्यांना आवश्यक जमीन सुपूर्द करण्यासाठी प्रारंभिक पावले उचलण्याचे निर्देश दिले.

विश्वेश्वरय्या टेक्निकल युनिव्हर्सिटी (व्हीटीयू) आणि राणी चन्नम्मा युनिव्हर्सिटी (आरसीयु) यासह अनेक अभियांत्रिकी महाविद्यालये, वैद्यकीय आणि दंत महाविद्यालये आणि आशियातील सर्वात मोठे आणि प्रतिष्ठित केएलई हॉस्पिटल हे बेळगाव शहरात असून बेळगाव शहर शैक्षणिकदृष्ट्या प्रआणि औद्योगिकदृष्ट्याही प्रगत आहे. या पार्श्वभूमीवर बेळगावमध्ये नूतनीकरण केलेल्या नवीन रेल्वे स्थानकात सर्व प्रकारच्या नवीन सुविधा उपलब्ध असून आपल्या मतदारसंघातील रहिवाशांच्या मागणीनुसार विविध मार्गावर नवीन गाड्या सुरू कराव्यात अशी विनंती खासदारांनी केली आहे.

यामध्ये बेळगाव – बेंगळुरू-बेळगाव वंदे भारत एक्सप्रेस, बेळगाव-पुणे-बेळगाव वंदे भारत एक्सप्रेस, बेळगाव-अयोध्या-बेळगाव, बेळगाव-पंढरपूर-बेळगाव, बेळगाव शहरातून केरळला जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी हुबळी-कोचीवेली-हुबळी साप्ताहिक एक्स्प्रेसचा बेळगावपर्यंत विस्तार,

बेळगाव – चेन्नई – बेळगाव दैनिक सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेन, बेळगाव-वाराणसी-बेळगाव एक्सप्रेस ( पंधरा दिवसातून एकदा), बेळगाव-जोधपूर-बेळगाव एक्सप्रेस (पंधरा दिवसातून एकदा) या रेल्वे सेवांचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. याचबरोबर बेळगाव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाबाबत खासदार जगदीश शेट्टर यांनी केंद्रीय मंत्र्यांशी विविध विषयांवर चर्चा केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.