बेळगाव लाईव्ह :तातडीच्या दुरुस्तीच्या कामामुळे रविवार दि. 9 जून 2024 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत बेळगाव शहरातील वीज पुरवठा खंडित केला जाणार असल्याचे हेस्कॉमने कळविले आहे.
येत्या रविवारी टिळकवाडी, हिंदवाडी, जक्कीरहोंडा, स्वामी विवेकानंद कॉलनी, पाटील गल्ली, शहर, कॅन्टोन्मेंट, मारुती गल्ली,
नानावाडी, शहापूर आणि कपलेश्वर येथील फिडरसह वडगाव येथील सर्व फीडर्सचा विद्युत पुरवठा सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत खंडीत केला जाणार आहे.
याची नोंद घेऊन नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन हेस्कॉमच्या कार्यकारी अभियंत्यांनी केले आहे.