बेळगाव लाईव्ह : आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी बेळगावच्या दिव्यांग थ्रोबॉल पटुंना आर्थिक मदतीची गरज असल्याचे जाणून बेळगावच्या फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर यांनी आपली शिर्डी वारी रद्द करून या सहलीचा खर्च खेळाडूंना सुपूर्द केला आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे आणि पर्यायाने बेळगावचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघाला आर्थिक अडचणी असल्याचे नुकतेच एका पत्रकार परिषदेत सांगण्यात आले होते. हि बाब लक्षात घेऊन १०००० रुपयांची आर्थिक मदत संतोष दरेकर यांनी सदर खेळाडूंना दिली आहे. तसेच या खेळाडूंना आर्थिक सहकार्य करून आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी संधी द्यावी, यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढाकार घयावा असे आवाहन संतोष दरेकर यांनी केले आहे.
यावेळी अवधूत तुडवेकर, स्वयम पाटील, गणेश प्रभू, सौ.कला व्ही. मुजुमदार, रेल्वे पोलिस पीएसआय व्यंकटेश एस आदी उपस्थित होते.
बेळगावच्या दिव्यांग खेळाडूंना आर्थिक मदत करण्याचे आवाहन
बेळगाव लाईव्ह : गेल्या ९ वर्षांपासून सातत्याने प्रयत्न करून अखेर आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी संधी उपलब्ध झालेल्या खेळाडूंना आर्थिक सहकार्याची गरज आहे. आपल्या देशाचे प्रतिनिधित्व आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्यासाठी हे खेळाडूं 8 ते 10 जुलै दरम्यान श्रीलंकेत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय थ्रो बॉल स्पर्धेत सहभाग घेणार आहेत.
यामध्ये सूरज धामणेकर, महांतेश होंगळ, मन्सूर मुल्ला, सुरेश कुंभार, एरन्ना होंडप्पाण्णा, मनीषा पाटील, भाग्य मलाली या खेळाडूंचा समावेश आहे. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे खेळाडू गेली ९ वर्षे सातत्याने प्रयत्न करत असून त्यांच्या या दौऱ्यासाठी 65,००० रुपयांचा खर्च आहे. या दौऱ्यात प्रवास, निवास आणि इतर आवश्यक खर्च समाविष्ट असून समाजातील दानशूर व्यक्तींनी, सेवाभावी संस्थांनी आर्थिक सहकार्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बँक खात्याचा तपशील
स्टेट बँक ऑफ इंडिया : बेळगाव जिल्हा दिव्यांग क्रीडा संघ
बँक खाते क्रमांक: 39389640257
IFSC कोड: SBINΟΟ40419
फोन नंबर : 8861470235
पॅन क्रमांक: AALAB0007A