Friday, June 28, 2024

/

सायबर गुन्हेगारांचा ‘असा’ नवा फंडा

 belgaum

बेळगाव लाईव्ह :सायबर गुन्हेगारांनी आता सावजाना ठकवण्यासाठी नवा फंडा अजमावयास सुरुवात केली आहे. तुमच्या मुलाने बलात्कार केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या सुटकेसाठी पैसे भरावे लागतील अन्यथा तुमचा मुलगा आयुष्यभर तुरुंगात राहील, असे फोनवर धमकावत तोतया पोलीस अधिकाऱ्याकडून एका वृद्धाची लुबाडणूक करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना काल शनिवारी अन्नपूर्णावाडी येथे घडली.

याबाबतची माहिती अशी की, अन्नपूर्णावाडी येथील इमामहुसेन हलकर्णी यांना काल शनिवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास + 48459266663 या क्रमांकावरून व्हाट्सअप वर एक व्हॉइस कॉल आला. त्या कॉलवर पलीकडून बोलणाऱ्या तोतया पोलीस अधिकाऱ्याने नमस्कार, मी सीपीआय बोलत आहे.

तुमचा मुलगा अकबर याने बलात्कार केला आहे. आम्ही तुमच्या मुलाला चांगलेच ओळखतो. त्यामुळे त्याला तुम्ही वाचवणार की आयुष्यभर तुरुंगात ठेवणार? आम्ही काहींही करू शकतो.

 belgaum

यात त्याचा जीव ही जाऊ शकतो. तेंव्हा प्रकरण येथेच निकालात काढू, मात्र त्यासाठी पैसे द्या असे त्याने सांगितले. ज्या क्रमांकावरून इमामहुसेन यांना कॉल आला होता त्या क्रमांकाच्या डीपी वर एका पोलीस अधिकाऱ्याचा फोटो होता.

त्यामुळे त्या तोतया पोलीस अधिकाऱ्याच्या मागणीनुसार इमामहुसेन यांनी 10 हजार रुपये फोन वरून फोन पे करण्याची तयारी दर्शवली. मात्र यामध्ये तांत्रिक अडचण येऊन पेमेंट होऊ शकले नाही. दरम्यान इमामहुसेन यांनी आपल्या मुलाला फोन लावला. त्यावेळी त्याने आपण कामावर असल्याचे सांगितले.

त्यामुळे आपली फसवणूक होत असल्याचे हुसेन यांच्या लक्षात येताच त्यांनी स्थानिक समाजसेवक सनदी यांना बोलावून घटनेची माहिती दिली. त्यानंतर सनदी तसेच इमामहुसेन यांनी त्या तोतया अधिकाऱ्यांशी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याने आपला फोन ब्लॉक केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.