Friday, January 24, 2025

/

बेळगाव, कारवारमध्ये भाजप तर चिक्कोडीत काँग्रेसचा झेंडा

 belgaum

बेळगाव लाईव्ह : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाली असून बेळगाव लोकसभा मतदार संघातून भाजपचे जगदीश शेट्टर, कारवार लोकसभा मतदार संघातून भाजपचे विश्वेश्वर हेगडे कागेरी आणि चिक्कोडी लोकसभा मतदार संघातून काँग्रेसच्या प्रियांका जारकीहोळी विजयी झाल्या आहेत.

चिक्कोडी मतदार संघातील खासदारपदी कार्यरत असणाऱ्या आणि राजकारणातील मातब्बर समजल्या जाणाऱ्या अण्णासाहेब जोल्ले यांचा प्रियांका जारकीहोळी या नवख्या उमेदवाराकडून पराभव झाला असून प्रतिष्ठेच्या मुद्द्यावर लढविण्यात आलेल्या निवडणुकीत जारकीहोळी घराण्याने आपले वर्चस्व अबाधित राखले आहे.

चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातून मोठा बदल घडवत प्रियांका जारकीहोळी यांनी भाजपचे अण्णासाहेब जोल्ले यांचा पराभव केला त्यांना ६१८१६८ मते मिळाली आहेत. तर प्रियांका जारकीहोळी यांनी ७१०८२३ मते मिळवत ९२६५५ मतांनी जोल्ले यांचा पराभव केला आहे.Chikodi karwar bgm

कारवार लोकसभा मतदारसंघातून भाजपने जोरदार मुसंडी मारली असून भाजपचे विश्वेश्वर कजरी -हेगडे हे दोन लाखाहून अधिक मताधिक्याने विजयी झाले आहेत. कारवार लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे विश्वेश्वर हेगडे -कागेरी हे 294553 मतांनी विजयी ठरले असून याठिकाणीही भाजपचा बालेकिल्ला अबाधित राखण्यात आला आहे..

या मतदार संघात विश्वेश्वर हेगडे -कागेरी यांना 660979 मते तर काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांना 366426 मते मिळाली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.