बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहर विकास प्राधिकरणाच्या बुडा कणबर्गी स्कीम नं. 61 साठी 137.70 कोटी रुपयांचा विकास निधी सरकारने मंजूर केला असून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली विधानसौधमध्ये झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
बेंगलोर येथे पत्रकार परिषदेत कायदा व संसदीय कामकाज मंत्री एच. के. पाटील यांनी ही माहिती दिली. बेळगाव शहर विकास प्राधिकरणाच्या कणबर्गी येथील स्कीम नं. 61 या एकूण 157 एकर 1 गुंठा 8 आणे जमिनीतील घरकुल योजनेच्या विकासासाठी मंत्रिमंडळाने 137.70 कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे.
या प्रकल्पासाठी 2023-24 या आर्थिक वर्षासाठी प्रकाशित दरांच्या समान वेळापत्रकावर आधारित प्रारंभी 127.71 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र आता त्यात सुधारणा करून तो 137.70 कोटी रुपये इतका करण्यात आला आहे