बेळगाव लाईव्ह:बेळगावचे सुप्रसिद्ध वकील ॲड. आनंद संजय एम. नुली यांची गेल्या 19 जानेवारी 2024 रोजी भारताच्या माननीय सर्वोच्च न्यायालयाने वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त केली आहे.
ॲड. आनंद संजय एम. नुली हे बी.ए.एल.-एलएल.बी. पदवीधर असून त्यांनी विद्यापीठ कायदा महाविद्यालय बेंगलोर येथून एलएल. एम. ही पदवी संपादन केली आहे. कामगार अभ्यासामध्ये ते मास्टर ऑफ फिलॉसॉफी (एम.फील.) असून औद्योगिक संबंध आणि कर्मचारी व्यवस्थापन (पी.जी.डी.आय.आर.पी.एम.) तसेच बौद्धिक मालमत्ता अधिकार (पी.जी.आय.पी.आर.) यामध्ये त्यांनी पदव्युत्तर पदविका संपादन केल्या आहेत.
गेल्या 21 वर्षापासून ते वकिली व्यवसाय करत असून वैविध्यपूर्ण शैक्षणिक पार्श्वभूमीने त्याला नवीन ट्रेंड आणि कायदेशीर व्यवसायातील बदलांचा अवलंब करण्याचा व्यापक दृष्टीकोन दिला आहे. ॲड. नुली यांनी आपल्या वकिली कारकीर्दीची सुरुवात ॲड. सुब्बा रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली कर्नाटक उच्च न्यायालय आणि ट्रायल कोर्ट बेंगलोर येथे केली.
गेल्या 2006 सालापासून नवी दिल्ली येथे स्वतंत्रपणे वकिली व्यवसाय करत असलेले ॲड. नूली हे भारताचे सर्वोच्च न्यायालय, दिल्ली उच्च न्यायालय आणि दिल्ली येथील इतर सर्वोच्च आयोग तसेच न्यायाधिकरणातील सराव आणि कार्यपद्धतींशी चांगल्या प्रकारे परिचित असून त्यामध्ये निपुण आहेत.
गेल्या काही वर्षात त्यांनी भारत सरकारची केंद्रीय संस्था भारतीय पॅरालिम्पिक कमिटी बृहत बेंगलोर महानगरपालिका कृषी उत्पादन विपणन समिती कर्नाटक 20 नियमात आयोग कर्नाटक सरकार आणि बेंगलोर विकास प्राधिकरण यांच्यासाठी सल्लागार आणि प्रतिनिधी म्हणून काम पाहिले आहे. आपल्या देशातील कायदेशीर न्यायशास्त्र आणि कायदेशीर शिक्षण यांच्या विकासासाठी त्यांनी अल्प योगदान दिले आहे. त्यांनी निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टवरील पुस्तकात केलेल्या सुधारणा माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक निकालांचा एक भाग बनल्या आहेत.
ॲड नुली हे सुप्रीम कोर्टात इंडियाच्या बार कौन्सिलचे तरुण सदस्य आहेत बेळगाव येथील प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट आर .एन . हरगुडे यांच्या वतीने नुली यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंजुनाथ पाटील, विजय पाटील, सी ए सनील हरगुडे,चेतन बागी, वकील सुधीर बेळलली, रोहन हरगुडे आदी उपस्थित होते.