बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील अथणी शहराच्या हद्दीतील चिक्कट्टी येथील अन्न प्रक्रिया युनिटमध्ये मंगळवारी बॉयलरचा स्फोट होऊन एका महिलेचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले.
औद्योगिक परिसरातील एका छोट्या कारखान्यात बॉयलरचा स्फोट झाल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या रुग्णांना रुग्णालयात उपचारासाठी नेताना अर्ध्यातच एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
शोभा तेली असे मृत महिलेचे नाव आहे. उर्वरित जखमींची प्रकृती चिंताजनक असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
यामध्ये सत्ती गावातील सुनंदा सिद्दप्पा तेली या महिलेची प्रकृती चिंताजनक असून गंभीर जखमींना अथणी व महाराष्ट्रातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे.
बॉयलरच्या अचानक झालेल्या स्फोटामुळे कारखान्याची भिंत पूर्णपणे कोसळली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि अथणी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे.