बेळगाव लाईव्ह: चिकोडी लोकसभा मतदारसंघात अत्यंत चुरशीने झालेल्या मतदानात विक्रमी 78.51 टक्के तर बेळगाव लोकसभा मतदार संघात 71.38 टक्के अधिक मतदारांनी शांततेत मतदानाचा हक्क बजावला.कडक ऊन, उनामुळे होणारी काहीली, पण दुसरीकडे मतदान करण्यासाठी मतदारांचा उत्साह आहे वाढल्याचे चिकोडी लोकसभा मतदारसंघात दिसून आले. चिकोडी लोकसभा मतदारसंघात सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली.
चिकोडी लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार अण्णासाहेब जोले यांनी एकसंबा येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्यासोबत पत्नी निपाणीचे आमदार शशिकला जोले व पुत्र बसवप्रसाद, ज्योती प्रसाद यांच्यासह जोले कुटुंबीयांनी मतदानाचा हक्क बजावला.
चिकोडी लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका जारकीहोळी याने वंटमुरी येथे मतदानाचा हक्क बजावला. विधान परिषद सदस्य प्रकाश हुकेरी व आमदार गणेश हुकेरी यांनी एकसंबा येथील मतदान केंद्रावर मतदान केले.
चिकोडी लोकसभा मतदारसंघातील विधान सभा मतदारसंघ निहाय झालेली मतदानाची आकडेवारी
यमकनमर्डी 82.14 %
निपाणी 79.73%
चिकोडी सदलगा 79.58%
कागवाड 78.84%
अथणी 78.66%
हुक्केरी 78.35%
रायबाग 75.08%
कुडची 74.74%
बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या आठ विधान सभा मतदारसंघात किती मतदान झाले याचा तपशील
बेळगाव ग्रामीण 76. 87%
सौंदत्ती 76.73%
रामदुर्ग 73.6%
बैलहोंगल 73.5%
अरभावी 71.92%
गोकाक 71.06%
बेळगाव दक्षिण 66.52%
बेळगाव उत्तर 63.62%
बेळगाव जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघ कारवार म्हणजेच उत्तर कन्नड मतदारसंघात येतात त्यातील खानापूर आणि कित्तूर मतदारसंघात देखील चुरशीने मतदान झाले.
खानापूर विधानसभा मतदारसंघात 73.87% मतदान तर कित्तूर विधानसभा मतदारसंघात 76.25 % मतदान झाले.