महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबविले*

0
8
Apmc police station
Apmc police station
 belgaum

बेळगाव लाईव्ह -सह्याद्री नगर जवळ राहणाऱ्या सौ अंजना परशराम आलोजी (वय वर्ष 58) यांच्या गळ्यातील दीड तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी लांबविले .

याबाबतचे वृत्त असे की, सौ अंजना आलोजी या रोजच्या प्रमाणे आज सायंकाळी जनावरांना चरण्यासाठी घेऊन जवळच असलेल्या नालंदा इंटरनॅशनल स्कूलकडे गेल्या होत्या.
सायंकाळी 5:15 वाजण्याच्या सुमारास स्प्लेंडर मोटर सायकलवरून आलेल्या दोन तरुणांपैकी एकट्याने त्यांना तेथे पत्ता विचारला. त्यानंतर तो पुढे जाऊन कोणाशी तरी फोनवर मराठीतूनच बोलला व मोटरसायकल इकडे घेऊन ये असे त्याला सांगितले.

याच वेळी सौ आलोजी या जनावरांकडे पहात बसल्या असताना पाठीमागून येऊन एका तरुणाने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्राला हिसका मारला व गटारीवरून उडी मारून मोटरसायकल वरून ते दोघेही पसार झाले.

 belgaum

लगेच आलोजी यांनी आरडाओरड केली असता आजूबाजूचे लोक घराबाहेर आले आणि त्यांनी मोटरसायकलवरून त्या चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला पण ते दोघेही तोंडावर मास्क ओढून कंग्राळीच्या दिशेने मोटरसायकल वरून पळून जाण्यात यशस्वी झाले.

ही घटना एपीएमसी पोलीसाना कळविल्यानंतर पोलिसांनी त्या भागात येऊन सीसीटीव्ही फुटेज पाहून चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण अद्याप चोरट्याना पकडण्यात यश आलेले नाही. याबाबतची रितसर तक्रार आलोजी यांनी एपीएमसी पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.

या गरीब महिलेने अलीकडेच हे नवे मंगळसूत्र करून घेतले होते व त्या पदर झाकूनच बसल्या होत्या असे असतानाही त्या पंचविशीतील तरुणानी हे कृत्य केले आहे. या घटनेमुळे परिसरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे पोलिसांनी अशा घटना घडू नयेत यासाठी प्रयत्न करावेत असे बोलले जात आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.