Monday, February 10, 2025

/

नैऋत्य रेल्वेची पहिल्यांदाच अरुणाचल प्रदेशला रेल्वे सेवा

 belgaum

बेळगाव लाईव्ह :उन्हाळ्याच्या सुट्टीतील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी दूर करण्यासाठी नैऋत्य रेल्वेकडून बुधवार दि. 8 मेपासून येत्या दि. 8 जून 2024 या कालावधीपर्यंत रेल्वे क्र. 07387/07388 हुबळी – निहारलगन – हुबळी ही उन्हाळी विशेष एक्सप्रेस रेल्वे सेवा दर बुधवारी व शनिवारी सुरू केली जाणार आहे.

रेल्वे क्र. 07387 हुबळी – निहारलगन उन्हाळी विशेष एक्सप्रेस रेल्वेसेवा येत्या बुधवार दि. 8 मेपासून प्रारंभ होत आहे. सदर विशेष एक्सप्रेस रेल्वे येत्या 5 जून 2024 पर्यंत दर बुधवारी याप्रमाणे एकूण पाच फेऱ्या करेल. त्याचप्रमाणे रेल्वे क्र. 07388 – निहारलगन ते हुबळी ही उन्हाळी विशेष एक्सप्रेस रेल्वेसेवा शनिवार दि. 5 मे 2024 रोजी प्रारंभ होत आहे.

ही रेल्वे येत्या 8 जून 2024 पर्यंत दर शनिवारी याप्रमाणे परतीच्या एकूण पाच फेऱ्या करेल. सदर रेल्वेची रचना 16- एलडब्ल्यूएसीसीएनइ, 01-एलडब्ल्यूएसीसीएन, 02-एलडब्ल्यूएसीसीडब्ल्यू, 02-एलडब्ल्यूएलआरआरएम अशी एकूण 22 एलएचबी कोचीस अशी असणार आहे.

रेल्वे क्र. 07387 हुबळी – निहारलगन उन्हाळी विशेष एक्सप्रेस रेल्वे येत्या बुधवारपासून 8 मे पासून दर बुधवारी दुपारी 12:05 वाजता हुबळी येथून सुटेल.

त्यानंतर गदग मार्गे शुक्रवारी रात्री 11:00 वाजता निहारलगन (अरुणाचल प्रदेश) रेल्वे स्थानकावर पोहचेल. या पद्धतीने हुबळी येथून पहिल्यांदाच अरुणाचल प्रदेश येथे नैऋत्य रेल्वेची सेवा उपलब्ध करून दिली जात आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.