बेळगाव लाईव्ह : बॅक वॉटर मध्ये बुडणाऱ्या बापाला वाचवायला जाणाऱ्या मुलीचा बुडून दुर्दैवी अंत झाल्याची घटना बुधवारी घडली आहे.
तिलारी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये स्वतःच्या वडिलांना वाचवायला गेलेली सुळगा येथील अकरा वर्षीय मुलीचा बुडून अंत झाला आहे.
हजगोळी चाळोबा देवालय पर्यटन स्थळाजवळ बुधवारी ही घटना घडली आहे. फिओना सलोमन जमुला वय 11 रा. आंबेडकर गल्ली सुळगा बेळगाव असे मयत झालेला या दुर्दैवी मुलीचे नाव असून तिचा शोध सुरू आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की सुळगा येथील सलोमन जमुला हे आपल्या दोन मुलींना घेऊन हजगोळी येथील तिलारी बॅकवॉटर परिसरात फिरायला गेले होते.
यावेळी ते बॅक वॉटर मध्ये आंघोळीसाठी उतरले होते त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडू लागले होते त्यावेळी आपल्या वडिलांना वाचवण्यासाठी फोओनाने पाण्यात उडी मारली आणि तीही बुडाली.
वडील सलोमन जमुला यांना वाचवण्यात पर्यटकांना यश आले मात्र मुलगी पाण्यातच बुडाली. दरम्यान फोओनाचा शोध सुरू आहे.




