Sunday, November 17, 2024

/

सुंठकर यांच्याशी तालुका म. ए. समितीचा काडीचाही संबंध नाही -किणेकर

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवाराला आपल्या गटाचा जाहीर पाठिंबा व्यक्त करणाऱ्या शिवाजी सुंठकर यांच्याशी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचा काडीचाही संबंध नाही, असे जाहीर स्पष्टीकरण या समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांनी केले आहे.

शहरातील मराठा मंदिर येथे बोलवण्यात आलेल्या बेळगाव शहर व तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या तातडीच्या बैठकीत हे स्पष्टीकरण करण्यात आले आहे. बैठकीत बोलताना बेळगाव तालुका म. ए. समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर सांगितले की, लोकसभा निवडणूक जाहीर होताच बेळगाव शहर आणि महाराष्ट्र एकीकरण समिती यांची संयुक्त बैठक मराठा मंदिर येथे झाली.

कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार त्या बैठकीत एकमताने ही निवडणूक लढवायचे ठरले. त्यानुसार बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती उमेदवार महादेव पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिली असून त्यांच्या प्रचाराला लागली आहे. परवाच तालुक्यातले शिवाजी सुंठकर जे बंडखोरी करून गेल्या 2008 पासून समितीच्या बाहेर होते, ज्यांना 2022 मध्ये पुन्हा महाराष्ट्र एकीकरण समितीत घेण्यात आले होते. त्यांनी कांही दिवसांपूर्वी वेगळी बैठक घेऊन त्यामध्ये शिवाजी सुंठकर गटाचा भाजपला पाठिंबा अशी भूमिका जाहीर केली आहे.

त्याचाशी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचा काडीचाही संबंध नाही. तालुका म. ए. समिती ही मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती व बेळगाव शहर म. ए. समितीच्या निर्णयाशी बांधील आहे. त्याप्रमाणे महादेव तुकाराम पाटील यांचा तालुक्यात प्रचार केला जात आहे. तेंव्हा समितीच्या या निर्णयाबद्दल शिवाजी सुंठकर जे बोलत आहेत, प्रचार करत आहेत त्याच्याशी तालुका म. ए. समितीचा काहींही संबंध नाही असे किणेकर यांनी सांगितले. त्याचप्रमाणे याची दखल बेळगाव तालुक्यातील तसेच सीमाभागातील समस्त मराठा बांधव व मराठी भाषिकांनी घेऊन समिती उमेदवार महादेव पाटील यांच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन करून शिवाजी सुंठकर यांचा बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची काहीही संबंध नाही, असे माजी आमदार मनोहर किणेकर यांनी शेवटी पुन्हा एकदा स्पष्ट केले केले.

याप्रसंगी बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष रणजीत चव्हाण -पाटील, म. ए. समितीचे उमेदवार महादेव पाटील, रमाकांत कोंडुसकर, प्रकाश मरगाळे, विकास कळघटगी आदिंसह बेळगाव शहर व तालुका म. ए. समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.