बेळगाव लाईव्ह :जुने ते सोने याचा आजच्या तरुणाईला विसर पडला असला तरी कधी ना कधी त्यांना याचे प्रत्यंतर येणार आहे. आज आपले आई-वडील म्हणजे अडगळ असे अनेकांना वाटते पण कधी ना कधी त्यांची किंमत नक्कीच कळते.
हाच संदेश अधोरेखित करणारा “जुनं फर्निचर” हा चित्रपट शांताई मधील वृद्ध ज्येष्ठ नागरिकांनी पाहिला आणि त्यांच्या मनात नेमक्या वरील भावना निर्माण झाल्या.
शहरातील शांताई वृद्धाश्रमाचे व्यवस्थापन मंडळ आश्रमाचे सदस्य असलेल्या जेष्ठ नागरिकांना यांच्या आयुष्याच्या सांजवेळी सर्व तो आनंद मिळवून देण्याचा प्रयत्न करत असते.
त्याच अनुषंगाने शांताई वृद्धाश्रमाचे कार्याध्यक्ष माजी महापौर व सामाजिक कार्यकर्ते विजय मोरे यांच्या पुढाकाराने आश्रमातील आजी -आजोबांना आज गुरुवारी “जुनं फर्निचर” हा चित्रपट दाखविण्यात आला.
याप्रसंगी बेळगाव लाईव्हशी बोलताना विजय मोरे यांनी जनतेने विशेष करून आजच्या युवा पिढीने आपल्या आई-वडिलांना, आजा आजीला कसे सांभाळायचे? हे समजून घेण्यासाठी इतर कोठेही न जाता आवर्जून नर्तकी चित्रपटगृहात जाऊन जुनं फर्निचर हा चित्रपट नक्की पहावा, असे आवाहन केले.
तसेच सर्वांनी हा चित्रपट पहावा मला खात्री आहे की प्रत्येकाच्या जीवनात वागणुकी त्यामुळे 101 टक्के सकारात्मक बदल घडेल, असा मोरे यांनी विश्वास व्यक्त केला. तसेच सदर चित्रपट पाहून शांताई वृद्धाश्रमातील सर्व सदस्य सद्गतीत झाल्याचे त्यांनी सांगितले.