Saturday, December 21, 2024

/

३१ मे पासून शाळा गजबजणार

 belgaum

बेळगाव लाईव्ह : उन्हाळी सुट्टीनंतर २०२४-२५ या नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात २९ मे पासून सुरु होत असून नवीन विद्यार्थ्यांचा प्रारंभोत्सव शुक्रवार दि. 31 मे रोजी होणार आहे. त्यामुळे शुक्रवारपासून शाळेचा परिसर विद्यार्थ्यांनी गजबजणार आहे.

शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यापुस्तके, तसेच गणवेशांचे वितरण केले जाणार आहे. विद्यार्थी व पालकांना मध्यान्ह आहार दिला जाणार आहे. जून महिन्यात पावसाचे वातावरण असल्याने शाळा परिसरात पाणी आल्यास शाळांना सुटी द्यावी. जे विद्यार्थी नदी-नाले ओलांडून येतात, त्यांची माहिती जमा करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली तरी मागील वर्षाच्या अभ्यासक्रमाची उजळणी घेऊन त्यानंतरच पुढील वर्षाच्या अभ्यासक्रमाला सुरुवात केली जाणार आहे. यासाठी 1 ते 30 जून दरम्यान सेतूबंध कार्यक्रम घेतला जाणार आहे. शाळा परिसरात 5 जून रोजी पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करण्याच्या सूचना गटशिक्षणाधिकारी व शिक्षकांना केल्या आहेत.school-covid

३१ मे पासून विद्यार्थी शाळेत हजर राहणार असल्याने तत्पूर्वी सर्व शिक्षकांनी शाळेत दाखल होऊन प्रारंभोत्सवाची तयारी करण्याच्या सूचना जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना केल्या आहेत. गटशिक्षणाधिकाऱ्यांनी शाळांना भेटी देऊन तेथील सुविधांची पाहणी करावयाची आहे.

दि. 29 व 30 रोजी शिक्षकांनी शाळेतील स्वच्छता करण्यासोबतच एसडीएमसी कमिटीची बैठक घ्यावयाची आहे. वर्षभराचा आराखडा तयार करून वेळापत्रक तयार करावे. प्रभागातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांची माहिती घेऊन त्यांच्या घरी जाऊन भेटी द्याव्यात. प्रारंभोत्सवानिमित्त शाळेला आकर्षक पद्धतीने सजावट करण्याची सूचना करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.