Sunday, June 30, 2024

/

नवे शैक्षणिक वर्ष सुरू; पुन्हा गजबजल्या शाळा

 belgaum

बेळगाव लाईव्ह:राज्यातील नव्या शालेय शैक्षणिक वर्षाला आज शुक्रवारपासून प्रारंभ झाल्यामुळे बेळगाव शहरासह जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये पुन्हा विद्यार्थी -विद्यार्थिनींचा किलबिलाट सुरू झाला आहे.

आजपासून आपली शाळा सुरू होणार असल्यामुळे विद्यार्थी -विद्यार्थिनींमध्ये जुन्या व नव्या मित्र-मैत्रिणींना भेटण्याच्या उत्सुकतेबरोबरच उत्साही वातावरण पहावयास मिळत होते. वर्षाच्या पहिल्या दिवशी शाळेत वेळेवर जावे यासाठी विद्यार्थी -विद्यार्थिनींसह त्यांच्या पालकवर्गाची सकाळपासून लगबग सुरू होती.

नव्या शैक्षणिक वर्षाच्या स्वागतासाठी बहुतांश शाळांमध्ये आज प्रारंभोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्ताने शाळेची साफसफाई करण्याबरोबरच कांही शाळांसमोर रांगोळ्या रेखाटण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त अनेक शाळांनी विद्यार्थी -विद्यार्थिनींच्या स्वागतासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्याचे दिसून आले.School

 belgaum

एकंदर आज सकाळी शहरासह जिल्ह्यातील सर्व शाळा विद्यार्थी -विद्यार्थिनींनी गजबजून गेल्याचे पहायला मिळाले. नव्या शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस असल्यामुळे बऱ्याच शाळांनी पालकांच्या बैठकीचेही आयोजन केले होते.

याचबरोबर आज शिक्षण खात्याने उपलब्ध करून दिलेल्या मोफत पुस्तकांचेही वितरण करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.