Sunday, July 7, 2024

/

पालकांनो.. जबाबदारीने कधी वागणार?

 belgaum

बेळगाव लाईव्ह : पुण्यात अल्पवयीन मुलाकडून झालेल्या कार अपघाताची चर्चा देशभर सुरु असताना बेळगावमधील वडगावात अल्पवयीन मुलाकडून कार चालविली जात असल्याचा व्हिडीओ वायरल झाला आहे. दरम्यान पुण्यातील झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रकारचे मेसेज, जागृती करणारे लेख, रहदारी विभागाकडून सातत्याने करण्यात येत असलेल्या सूचना डावलून पालकवर्गातून अल्पवयीनांच्या हाती वाहनांच्या चाव्या देण्याचे प्रकार सर्रास पुढे येत असल्याचे पाहायला मिळत आहे.

आदर्शनगर-वडगाव भागात अल्पवयीन मुलगा भरधाव मोटार चलवीत असल्याचा व्हिडिओ सध्या बेळगावभर वायरल होत असून नागरीकातून याबद्दल टीका केली जात आहे. काल रात्री हिंदवाडी येथील आय एम ई आर कॉलेज समोर भरधाव वेगाने धावणाऱ्या एका दुचाकीने दुसऱ्या दुचाकीला जोराची धडक दिल्याने एका युवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता.  अपघातातील दुचाकी चालवणारे हे युवक शहरात अति वेगाने दुचाकी चालवत होते त्यामुळे हा अपघात झाला त्यात एकाला जीव गमावावा लागला अशावेळी पालकांची जबाबदारी फार महत्त्वाची बनली आहे.

पुण्यात झालेल्या अपघाताचे पडसाद देशभर उमटत असून या पार्श्वभूमीवर बेळगाव पोलिस आयुक्तालयातर्फे व्यापक खरबरदारी घेण्यात येत आहे. अल्पवयीन मुलांकडे दुचाकी, मोटारीचा विषय ऐरणीवर आला आहे.

 belgaum

पुण्यातील दुर्दैवी घटनेनंतर देशातील विविध शहरांमध्ये वाहतुकीच्या नियमांची अधिक काटेकोर अंमलबजावणी सुरू आहे. बेळगावातही अल्पवयीन मुलांकडे दुचाकी वा मोटार आढळून आल्यानंतर कारवाई हाती घेण्यात येत आहे. यास्वरुपाच्या प्रकरणांत दुचाकी वा मोटारी पहिल्यांदा जप्त केल्या जातात. त्यानंतर पालकांना बोलावून घेत समज देण्यासोबत २५ हजार रुपयांपर्यंतच्या दंडाची आकारणी सुरू आहे. शिवाय कोणत्याही अनुचित घटनेसाठी पालकांना जबाबदार धरण्यात येत आहे. मात्र असे असूनही पालकवर्गातून या सर्व गोष्टींना केराची टोपली दाखवून मनमानी करण्यात येत असल्याचे अनेकवेळा दिसून येत आहे.Parents resp

या संदर्भात दोन दिवसांपूर्वीच ‘बेळगाव लाईव्ह’ने वृत्तांकन केले होते. मात्र याचदरम्यान वडगावमध्ये घडलेला प्रकार समोर आला आहे. आदर्षनगर वडगावमध्ये अल्पवयीन मुलगा भरधाव मोटार घेऊन जात असल्याचा व्हिडिओ रविवारी येथील रहिवाशांनी टिपला आहे. सदर मुलाला मोटार थांबविण्याची मागणी रहिवाशांकडून करण्यात आली.

मात्र, त्याला प्रतिसाद न देता भरधाव कारमधून मित्रांसोबत तो निघून गेल्याचे सांगण्यात येत आहे. या संदर्भात पोलिस आयुक्तांकडून तक्रार केली होती. पोलिस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांनी चौकशी हाती घेतल्याचे सांगत व्हिडिओत दिसणाऱ्या तरुणाची माहिती घेतली जात असल्याचे कळविले आहे.

चार दिवसापूर्वी बेळगाव live  ने या संदर्भात केलेली बातमी

अल्पवयीन मुलांच्या हाती दुचाकीच्या चाव्या…! *सावधान*

अल्पवयीन मुलांच्या हाती दुचाकीच्या चाव्या…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.