बेळगाव लाईव्ह – कर्नाटक राज्यात दुसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवार दिनांक सात मे रोजी होत आहे.आज रविवारी सायंकाळी जाहीर प्रचार बंद होत आहे.त्याचबरोबर बेळगाव आणि चिकोडी लोकसभा मतदारसंघातील मतदानासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केल्याची माहिती जिल्हाधिकारी निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
यावेळी डी सी म्हणाले जिल्हाधिकारी पाटील म्हणाले,आज रविवारी सायंकाळी सहा वाजल्यानंतर जाहीर प्रचार बंद होत आहे. बेळगाव आणि चिकोडी या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील 18 विधानसभा मतदारसंघात जमाबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.
राज्यात युवा मतदारांची संख्या बेळगाव जिल्ह्यात सर्वाधिक आहे. दिव्यांग तसेच वृद्ध सरकारी कर्मचाऱ्यांनी यापूर्वीच निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनानुसार मतदान केले आहे.उद्यापासून प्रत्येक मतदान केंद्रांवर मतदान यंत्रणा पाठविली जाणार आहे.
प्रत्येक मतदार संघातील मतदान केंद्रांवर योग्य त्या प्रकारची व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मतदान केंद्रांपासून 200 मीटर अंतरावर प्रत्येक पक्षाला एक छोटे टेबल छोटा बॅनर लावण्याची परवानगी देण्यात आली आहे.
मतदानाच्या पार्श्वभूमीवर 24 हजार सरकारी कर्मचारी तसेच दहा हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. संवेदनशील आणि अति संवेदनशील भागात सीआरपीएफ जवानांची तुकडी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आली आहे. प्रत्येक पंधरा ते वीस बुध मागे एक विशेष मोबाईल पथक परिस्थितीवर नजर ठेवून राहणार आहे.
रविवारी सायंकाळपासून दोन्ही मतदार संघात मद्य विक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. माध्यमांना एक्झिट पोल प्रसारित करणे बाबत निर्बंध घालण्यात आले आहेत. निवडणूक प्रक्रिया काळात प्रशासन कोणत्याही दबावाखाली काम करत नसून निवडणूक आयोगाच्या सूचना आणि नियमांचे पालन करत असल्याचेही नितेश पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.