बेळगाव लाईव्ह:देशाचे संविधान बदलण्यासाठी एनडीए काम करत आहे. त्यांचा महिला शेतकरी आणि दलित विरोधी डीएनए आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रभारी सरचिटणीस रणदीप सिंग सुरजेवाला यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला.
ते म्हणाले भाजप संविधान बदलणार नाही असे सांगत असले तरी ज्यावेळी त्यांच्या पक्षाचे खासदार अनंत कुमार हेगडे आणि विनय गोयल याबाबत बोलत होते त्यावेळी त्यांच्यावर का कारवाई करण्यात आली नाही.
संविधान बदलण्याची भाषा करणारे अनेक उमेदवार भाजपकडून रणांगणात उभे आहेत पण मोदी आणि शहा आपण कधीही संविधान बदलणार नाही, असे सांगत सुटले आहेत.
हा छुपा अजेंडा असून जनता आता त्यांच्या जुमल्यांना फसणार नाही. लोकसभा निवडणुकी नंतर राज्य सरकार गॅरेंटी योजना बंद करणार आहे, अशी अफवा भाजपकडून पसरवण्यात येत आहे. हा राज्यातील महिला आणि गरिबावर करण्यात येणारा अन्याय आहे. राज्यात सिद्धरामय्या आणि डी केशवकुमार यांचे सरकार असेपर्यंत गॅरंटी योजना बंद होणार नाहीत, असे हे सुरजेवाला यांनी सांगितले.
राज्यातील शेकडो महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या प्रज्वल रेवन्ना बाबत भाजप नेते कोणताही शब्द बोलत नाहीत. केंद्र सरकार कोणतीही कारवाई करत नाही याच्यातून त्यांची मानसिकता दिसून येते असा आरोप आहे सुरजेवाला यांनी केला.