बेळगाव लाईव्ह -“पायोनियर बँकेने आपल्या ज्येष्ठ सदस्यांचा सन्मान करून आपली समाजाप्रती असलेली कळकळ व्यक्त केली आहे. गेल्या काही वर्षात पायोनियर बँकेने जी उल्लेखनीय प्रगती केली आहे असे मत सौहार्द फेडरेशनचे उपनिबंधक रवींद्र पाटील यांनी व्यक्त केले.
बेळगाव येथील पायोनियर अर्बन बँकेच्या वतीने वयाची 75 वर्षे पूर्ण झालेल्या 80 हून अधिक ज्येष्ठ सभासदांचा सत्कार बुधवारी सायंकाळी एका खास कार्यक्रमात करण्यात आला. सौहार्द फेडरेशनचे उपनिबंधक रवींद्र पाटील, किरण ठाकूर उपस्थित होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे चेअरमन प्रदीप अष्टेकर हे होते. तर व्यासपीठावर व्हाईस चेअरमन रणजीत चव्हाण पाटील, बँक ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन अनंत लाड आणि सीईओ अनिता मूल्या या उपस्थित होत्या.
प्रारंभी अनिता मूल्या यांनी प्रास्ताविक करून बँकेच्या कार्याचा आढावा घेतला. तर चेअरमन प्रदीप अष्टेकर यांनी सर्वांचे स्वागत केले आणि “नजीकच्या कालावधीत संस्था अधिकाधिक कशी प्रगती करेल याकडे आमचे लक्ष आहे. त्यासाठी विविध योजनांची आखणी आम्ही करीत आहोत” असे त्यांनी सांगितले.
अनंत लाड यांनी सर्व मान्यवरांचा परिचय करून दिला. पाहुण्यांचा सन्मान चेअरमन ,वाईस चेअरमन यांच्या हस्ते करण्यात आला. तर 80 हून अधिक ज्येष्ठ सभासदांना शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि भव्य अशा भेट वस्तू देऊन किरण ठाकूर ,रवींद्र पाटील व सर्व संचालकांच्या वतीने गौरविण्यात आले.
याच कार्यक्रमात बँकेची प्रगती साधल्याबद्दल चेअरमन प्रदीप अष्टेकर व सीईओ अनिता मूल्या यांचा खास सत्कार करण्यात आला.
सामाजिक कार्याबद्दल नागरत्न रामगोंडा, स्पंदन नेटवर्कच्या कस्तुरी ,शववाहीका ड्रायव्हर निसार, सदाशिवनगर स्मशानभूमीत चाळीस वर्षापासून काम करनारे शंकर कोलकार आणि शांताई वृद्धाश्रमाचे कार्याध्यक्ष माजी महापौर विजय मोरे या समाजसेवकांचा किरण ठाकूर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याचबरोबर उत्कृष्ट व्यवस्थापक म्हणून सतीश अनगोळकर, उत्कृष्ट कर्मचारी म्हणून वर्षा बाळेकुंद्री आणि मायक्रो फायनान्स च्या टीम लीडर अंजुम शेख ,रेखा रेडेकर, आशा सावंत यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी उपस्थित असलेल्या बेळगाव बँक असोसिएशनचे उपाध्यक्ष बाळासाहेब काकतकर, त्याचबरोबर बेकर्स सोसायटीचे शिवाजीराव हंगिरकर आणि श्रीकांत देसाई यांचाही चेअरमन अष्टेकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बँकेचे संचालक शिवराज पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन रणजीत चव्हाण पाटील यांनी केले. सभासद आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते या सत्कार बद्दल अनेकांनी कृतज्ञता व्यक्त केली