बेळगाव लाईव्ह :चिकोडी तालुक्यातील अंकली पोलीस स्थानकाच्या आवारात दारू पार्टी करीत असल्याचे उघडकीस आले आहे. प्रकरणी एका हेडकॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आले आहे.
अंकली पोलीस स्थानकाच्या आवारात स्थानकाची जुनी इमारत आहे. या इमारतीत दारूची पार्टी केल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये चार खुर्च्या व एका टेबलवर रिकाम्या दारूच्या व सोड्याच्या बाटल्या दिसून आले आहेत. याविषयी काही प्रसार माध्यमांनी वृत्त प्रसारित केले होते
या घटनेमुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कायद्याचे रक्षण करणारे पोलीसच अशाप्रकारे पोलिस स्थानकाच्या इमारतीत दारूची पार्टी खुलेआम केल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
याप्रकरणी अंकली पोलीस स्थानकातील हेड कॉन्स्टेबल रामचंद्र खोत यांना निलंबित केल्याचा आदेश बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर गुळेद यांनी दिला आहे.