बेळगाव लाईव्ह : बेळगाव लोकसभा मतदारसंघासाठी दुपारी एक वाजेपर्यंत सरासरी 40 टक्के मतदान झाले आहे. सकाळच्या सत्रात मतदानाला बहुतांशी मतदान केंद्रावर गर्दी झाली होती मात्र दुपारनंतर अनेक मतदारसंघ कोरडीच पडली होती.
बेळगाव लोकसभा मतदारसंघातील अरभावी विधान सभा मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत बेळगाव ग्रामीण मध्ये सर्वाधिक 43.90 टक्के आणि 41.23%, बैलहोंगल मध्ये 38.53%,बेळगाव दक्षिण 38.81%,बेळगाव उत्तर 37.94%, गोकाक मध्ये 41.33%, रामदुर्ग मध्ये 40.29%, सौंदत्ती मतदार संघात 42.31%, मतदान झाले आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी बेळगाव मतदार संघात सकाळी 11 वाजेपर्यंत सरासरी 24.48 टक्के मतदान झाले असताना चिक्कोडी लोकसभा मतदारसंघांमध्ये मात्र या कालावधीत 27.23 टक्के इतके अधिक मतदान झाले होते. यापैकी सर्वाधिक 28.51 टक्के मतदान निपाणी विधानसभा मतदार संघात नोंदविले गेले आहे.
कर्नाटकातील दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठीचे मतदान आज मंगळवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत होत आहे. त्या अनुषंगाने चिक्कोडी लोकसभा मतदारसंघासाठी आठ विधानसभा मतदारसंघातून एकूण 17 लाख 61 हजार 694 मतदार मतदानाचा हक्क बजावत आहेत. सदर मतदार संघातील 1,896 मतदान केंद्रांमध्ये मतदान प्रक्रिया सुरू असून आज सकाळी पहिल्या दोन सत्रात म्हणजे सकाळी 9 व 11 वाजेपर्यंत येथील विविध विधानसभा मतदार संघामध्ये झालेल्या मतदानाची टक्केवारी पुढील प्रमाणे आहे. सकाळी 9 वाजेपर्यंतचे मतदान : निप्पाणी 11.65 टक्के, चिक्कोडी -सदलगा 11.07 टक्के, अथणी 10.74 टक्के, कागवाड 10.38 टक्के, कुडची 10.42 टक्के, रायबाग 10.82 टक्के, हुक्केरी 10.50 टक्के आणि यमकनमर्डी 10.81 टक्के.
आज सकाळी 11 वाजेपर्यंतचे मतदान : निप्पाणी 28:51 टक्के, चिक्कोडी -सदलगा 28:22 टक्के, अथणी 27:14 टक्के, कागवाड 26:72 टक्के, कुडची 26:26 टक्के, रायबाग 26:82 टक्के, हुक्केरी 26:62 टक्के आणि यमकनमर्डी 27:33 टक्के.
या पद्धतीने चिक्कोडी लोकसभा मतदार संघातील एकूण 17 लाख 61 हजार 694 स्त्री -पुरुष व इतर मतदारांपैकी एकूण 4 लाख 79 हजार 754 मतदारांनी आज मंगळवारी सकाळी 11 वाजेपर्यंत आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. टक्केवारी पाहता या कालावधीत सर्वाधिक 28.51 टक्के मतदान निपाणी विधानसभा मतदार संघात तर सर्वात कमी 26.26 टक्के कुडची मतदारसंघात नोंदविले गेले आहे.