बेळगाव लाईव्ह : शहरातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या लेंडी नाल्याला पावसाळ्यात येणाऱ्या पुरामुळे शहरातील विविध भागांना पुराचा फटका बसत असून पावसाळा सुरु होण्यापूर्वी मंगळवारपासून या नाल्याच्या स्वच्छतेच्या कामाला सुरुवात झाली आहे.
शहरातील सांडपाणी वाहणारा हा सर्वात मोठा नाला आहे. हा नाला बळ्ळारी नाल्याला जाऊन मिळतो. मात्र या नाल्यात कचरा साचून पाण्याचा निचरा होणेदेखील कठीण झाले होते.
मागील दोन ते तीन वर्षांपासून शहरातील विविध भागांना पुराचा फटका बसत आहे. लेंडी नाल्याची साफसफाई व रुंदीकरण केल्यास निश्चितच पुराचा धोका कमी होऊ शकतो. याचबरोबर परिसरात असणाऱया जमिनीचेदेखील नुकसान टाळू शकतो.
या नाल्यात साचणारा गाळ मोठ्या प्रमाणात असल्याने शेतकऱ्यांच्या पिकांसह शहरातील विविध भागांना पुराचा फटका बसत आहे.
यामुळे सातत्याने या नाल्याच्या सफाईसाठी करण्यात येणाऱ्या मागणीला अनुसरून या नाल्याची साफसफाई मोहीम हाती घेतली. या महिन्यात झालेल्या वळीव पावसाने शहरातील गटारी चोक अप होऊन पाणी रस्त्यावर तुंबले होते अनेक भागात पाणी देखील साचले होते नाल्यातून देखील व्यवस्थित पाण्याचा निचरा होत नव्हता त्यामुळे नाला सफाईची मागणी जनतेतून केली जात होती याची दखल घेत लेंडी नाला सफाई सुरू झाली आहे..