बेळगाव लाईव्ह :बहिणीला मोटार सायकलवर घेऊन फिरणार्या प्रियकराचा भावाने बहिणी समक्ष स्क्रुड्रायव्हरने भोसकून खून केला. गुरुवारी दुपारी 12 च्या सुमारास महांतेशनगर ब्रीजनजिक ही घटना घडली. भर दुपारी झालेल्या या घटनेने या परिसरात एकच खळबळ माजली होती
इब्राहिम उर्फ शोयब ख्वाजामैनुद्दीन चाऊस (रा. गुलजार गल्ली, न्यू गांधीनगर) असे खून झालेल्या प्रियकराचे नाव आहे. याप्रकरणी मुजम्मील मैनुद्दीन सत्तीगेरी (रा. गुलाब शहा गल्ली न्यू गांधीनगर) याला पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत समजलेल्या अधिक माहिती नुसार इब्राहिम याचे मुजम्मील याच्या बहिणीसोबत प्रेमसंबध होते. सुरुवातीला स्थानिक पंचानी इब्राहिम याला समजली गेली होती इब्राहिमच्या घरच्यांनी लग्नाला तयारी दर्शविली होती. पण, मुजम्मीलला हे स्थळ नको होते त्याला पसंद नव्हते. इब्राहिम गुरुवारी प्रेयसीसोबत दुचाकीवरुन फिरायला गेला होता त्याची माहिती मुजम्मिल याला मिळाली होती
महांतेशनगर ब्रीजनजिक दुपारी 12 च्या दरम्यान इब्राहिमची दुचाकी अडवून त्याने जाब विचारला त्यातवेळी तेथून जाणार्या मुजम्मीलने रागाच्या भरात इब्राहिमच्या पोटात स्क्रुड्रायव्हरने भोसकले त्यात इब्राहिम उर्फ शोयब ख्वाजामैनुद्दीन चाऊस याचा मृत्यू झाला.
भर दुपारी महंतेशनगर ब्रिज परिसरात झालेल्या घडलेल्या या घटनेने भितीचे वातावरण निर्माण झाले होते.या प्रकरणी माळ मारुती पोलिसानी खुनाचा गुन्हा दाखल करुन घेऊन मुजम्मीलला अटक केली.