बेळगाव लाईव्ह : राज्यातील लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपते ना संपते तोच विधानपरिषद निवडणुकीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर झाल्या असून यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री सतीश जारकीहोळी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
कर्नाटकातील विधानपरिषदेची जागा हि बेंगळुरू मधील इच्छुकांना देण्या ऐवजी उत्तर कर्नाटकातील इच्छुकांना देण्यात यावी. उत्तर कर्नाटकाला विधान परिषदेचे सदस्यत्व दिल्यास पक्षाला आणि समाजालाही फायदा होईल.
मात्र बेंगळुरू मध्ये या जागा दिल्यास त्याचा कोणताच फायदा होणार नाही. किमान दोन जागा उत्तर कर्नाटकाला द्याव्यात अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.
यावेळी एच. डी. कुमारस्वामी यांनी केलेल्या फोनटॅपिंग आरोपावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, केंद्रात भाजपचे सरकार आहे, जर हे आरोप खरे असतील तर त्याची चौकशी होऊ शकत नाही का? आरोपात काही तथ्य असेल तर नक्की याबाबत चौकशी व्हावी, असे सतीश जारकीहोळी म्हणाले.