बेळगाव लाईव्ह : महामंडळांच्या अध्यक्षपदांचे वाटप करताना दुर्लक्षित झालेल्या बेळगाव जिल्ह्याला विधान परिषदेत स्थान मिळविण्यासाठी काँग्रेस नेत्यांची धडपड सुरु झाली असून विधानपरिषदेसाठी काँग्रेसचे संकरित नेते विनय नावलगट्टी आणि सुनिल हणमन्नवर यांची नावे चर्चेत येऊ लागली आहेत.
विधान परिषद निवडणुकीसाठी दोन्ही काँग्रेस नेत्यांनी वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन लॉबिंग सुरु केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. बेळगाव जिल्ह्यातून विनय नावलगट्टी आणि सुनिल हणमन्नवर हे दोन्ही नेते मंत्री सतीश जारकीहोळी आणि लक्ष्मी हेब्बाळकर यांना विधानपरिषदेसाठी हवे आहेत.
दोन्ही मंत्र्यांच्या विश्वासातील विनय नावलगट्टी आणि सुनिल हणमन्नवर यांना विधानपरिषदेसाठी संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
१७ जागांसाठी तब्बल ३०० हुन अधिक इच्छुक उमेदवारांचे अर्ज काँग्रेसकडे आतापर्यंत आले असून विधान परिषद सदस्यत्वासाठी वाटाघाटी सुरु आहे.
बेळगाव जिल्ह्यातील नेत्यांना विधान परिषदेसाठी संधी मिळणे मुश्किल असून काँग्रेसने स्थानिकांना न्याय देण्याचा निर्णय घेतल्यास तसेच सामान्य कार्यकर्त्यांना संधी देण्याचा विचार केल्यास जिल्ह्यातील दोन इच्छुकांपैकी एकाला उमेदवारी मिळण्याची दात शक्यता वर्तविण्यात येत आहे.