बेळगाव लाईव्ह :सार्वजनिक माहितीसाठी सूचित केले जाते की, भारतीय रेल्वेच्या कुडची-मिरज विभागासाठी 15 जून 2024 रोजी 25 केव्ही एसी इलेक्ट्रिक कर्षण (ट्रॅक्शन) सुरू होईल. त्याच्या तयारीसाठी सर्व लेव्हल क्रॉसिंगवर रस्त्याच्या पातळीपासून 4.78 मीटर स्पष्ट कमाल उंचीसह उंची मापक स्थापित केले आहेत.
सदर उपायाचा उद्देश उच्च भार थेट संपर्कात येण्यापासून किंवा धोकादायकरीत्या ट्रॅक्शन वायर्सच्या जवळ येण्यापासून टाळण्यासाठी आहे. हे मापक लेव्हल क्रॉसिंगवर रेल्वे पातळीपासून कमाल 5.5 मीटर उंचीवर स्थापित केले जातील.
या उपायामुळे पुणे-बेंगळुरू मार्गाचे संपूर्णपणे विद्युतीकरण होणार आहे. हरिप्रिया एक्स्प्रेस, राणी चेन्नम्मा एक्स्प्रेसला आता लवकरच इलेक्ट्रिक लोको मिळणार आहेत. लोकांना सूचित केले जाते की वाहनात माल भरताना विनिर्दिष्ट उंचीची मर्यादा पाळावी जेणेकरून माल कोणत्याही परिस्थितीत मापकाच्या उंचीपेक्षा जास्त होणार नाही.
संबंधित उंचीपेक्षा जास्त माल भरल्यास पुढील प्रमाणे धोका आहे: वाहनातील उंची मापकापेक्षा जास्त मालामुळे रस्ता आणि रेल्वे मार्ग दोन्हीमध्ये संभाव्य अडथळे निर्माण होतात.
वाहनातून नेले जाणारे साहित्य किंवा उपकरणे अथवा वाहनाचेच नुकसान.
विद्युत वाहकाच्या संपर्कात आल्यामुळे किंवा त्यांच्या जवळ असल्यामुळे आग लागण्याचा तसेच जीवालाही धोका.
याशिवाय पूर्ण झालेल्या विभागात असलेले रेल्वे मार्ग आणि परिसराचा वापर करणाऱ्या सर्वांना कळविण्यात येत आहे की, 25,000 व्होल्ट 50 एचझेड एसी डोक्यावरील कर्षण वाहिन्या (ओव्हरहेड ट्रॅक्शन वायर्स) निर्दिष्ट तारखेला किंवा नंतर ऊर्जीत होतील.
त्या तारखेपासून सदर ओव्हरहेड ट्रॅक्शन लाईन्स सदा सर्वकाळ विद्युत प्रवाहित जिवंत (लाइव्ह) मानल्या जातील. त्यामुळे कोणत्याही अनधिकृत व्यक्तीने या ओव्हरहेड लाईन्सजवळ जाऊ नये किंवा त्यांच्या नजीक काम करू नये.