बेळगाव लाईव्ह : ही लोकसभा निवडणुकीत भाजपला 400 जागा मिळाल्या तर देशाचे संविधान बदलण्यात येणार आहे. हा भाजपाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा डाव आहे. पण सद्यस्थितीत भाजप 200 पेक्षा जास्त जागा जिंकू शकत नाही. ही निवडणूक म्हणजे स्वातंत्र्याचा दुसरा लढा असून काँग्रेस नक्की विजय होणार, असा विश्वास मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी रविवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येक देशवासियाला समतेचा अधिकार दिला आहे. पण भाजप नेहमी उलटी चाल खेळत आले आहे. राज्यात पाच गॅरंटी योजनांच्या माध्यमातून सामाजिक एकोपा जपण्याचा आणि परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला आहे. पण आमच्या योजना यशस्वी होऊ नये त्यासाठी केंद्र सरकारने सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांनी तांदूळ दिले नाही त्यामुळे आम्ही लोकांना पैसे दिले आहेत.
राज्यातील 92 टक्के लोकांना गृह ज्योति योजनेचा लाभ मिळाला आहे. कोट्यवधी महिलांना दर महिन्याला दोन हजार रुपये देण्यात येत आहेत. बेरोजगारांना भत्ता देण्यात येत आहे. आम्ही निवडणुकीपूर्वी दिलेले सर्व वचने सत्ता आल्यानंतर केवळ आठ महिन्यात पूर्ण केली आहेत. त्यामुळे राज्यातील लोकांना काँग्रेस बाबत विश्वास निर्माण झाला आहे. पण भाजपने आमच्या योजना लागू होऊ नयेत यासाठी आरकटी आणली त्यानंतर या योजनांमुळे राज्याचे दिवाळी निघेल अशी अफवा पसरवली.
निवडणुकीत लोकांमध्ये संभ्रम पसरण्यासाठी भाजपने आखलेला हा डाव आहे. पण आम्ही अर्थसंकल्पातच या पाचही गॅरंटी योजनांसाठी तब्बल 52 हजार कोटी रुपयांचा निधी राखून ठेवला आहे. विकास कामांसाठी 62000 कोटींपेक्षा अधिक निधी देण्यात येणार आहे त्यामुळे लोकांना भाजपचे खोटे बोलणे पटलेले नाही लोक काँग्रेस सोबत आहेत असा दावा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या दहा वर्षाच्या काळात कोणतीही कामगिरी केलेली नाही. पण ते द्वेष पसरवणारे वक्तव्य करत लोकांची फसगत करत आहेत. मोदींच्या या द्वेष पसरवणाऱ्या वक्तव्याविरोधात राहुल गांधी यांनी देशभर पदयात्रा काढून लोकांची मने जिंकली आहेत. काँग्रेसने लोकांसाठी 25 योजना आखल्या आहेत आम्ही सत्तेवर आल्यानंतर या योजनांची तत्काळ अंमलबजावणी करणार आहोत. आमच्याकडून लोकांची फसगत होणार नाही. महिला शेतकरी युवक या सर्वांना आम्ही न्याय देणार आहोत. भाजपने लोकांची फसगत करून अदानी अंबानी या उद्योजकांना पाठबळ दिले आहे. नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकावर सातत्याने अन्याय केला आहे. राज्य सरकारने केंद्राला 4.30 कोटी रुपयांचा कर दिला आहे. पण केंद्राने आम्हाला प्रति शंभर रुपये केवळ 13 रुपये परत केले आहे हा आमच्यावर झालेला अन्याय आहे. पण या न्यायाविरोधात भाजपच्या 25 खासदारांनी संसदेत एकदाही आवाज उठवलेला नाही, असा आरोप मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला.
राज्यातील अनेक तालुके दुष्काळग्रस्त आहेत त्यामुळे या तालुक्यांना दुष्काळ निधी देण्यात यावा, यासाठी आम्ही गतवर्षी सप्टेंबर महिन्यात केंद्राकडे प्रस्ताव पाठविला. एनडीआरएफ च्या मार्ग सूचीनुसार आम्ही केंद्राकडे १८१७२ कोटी रुपयांची मागणी केली होती. 48 लाख हेक्टर मधील पिकांचे नुकसान झाले आहे. केंद्राच्या पथकाने सुद्धा पाणी केली आहे पण केंद्र सरकारने आम्हाला दुष्काळ निधी दिलाच नाही त्या विरोधात आम्हाला सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली. नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकाला केवळ रिकामा चंबू दिला आहे. त्यामुळे यावेळी राज्यात 20 हून अधिक जागा काँग्रेस नक्कीच जिंकणार आहे असाही दावा सिद्धरामय यांनी केला.