बेळगाव लाईव्ह :लोकसभा निवडणुकीत भाजप आपणच जिंकणार या भ्रमात वावरत आहे. पण लोकांनी यावेळी काँग्रेसच्या गॅरंटी च्या बाजूने उभे राहण्याचे ठरविले असून भाजपला चांगलाच धडा त्यातून मिळणार आहे असा दावा उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला.
भाजपने राज्यात केलेली घाण आम्ही साफ करत आहोत. देशातील जनतेला आता बदल हवा आहे. धर्माचे राजकारण करण्याचा प्रयत्न भाजप सातत्याने करत आला आहे.
आम्ही मात्र राजकारणात धर्म आणत नाही. सर्वांना समान वागणूक हाच आमचा धर्म आहे. त्यामुळेच लोक आमच्या बाजूने उभे ठाकले आहेत.
भाजप सत्तेवर असताना कोणतेही विकासकाम राबवत नाही केवळ लोकांची फसगत करत राजकारण करत आले आहे. आम्ही राज्यात जनतेला न्याय दिला असून आता देशातही काँग्रेसची सत्ता येणार आहे.
त्यामुळे भाजपच्या भ्रमाचा भोपळा लवकरच फुटणार आहे असाही दावा उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी केला.