बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील रिद्धी सिद्धी सहकारी संस्थेचे अध्यक्ष शाम जाधव यांना बेळगावच्या जिल्हा ग्राहक आयोगाने दोषी ठरवून ३ वर्षे कारावास आणि रुपये १,००,००० अशी शिक्षा सुनावली आहे.
यासांदर्भात अधिक माहिती अशी कि, बेळगावमधील रिद्धी सिद्धी सहकारी संस्थेच्या माध्यमातून रवींद्र कुंभोजकर आणि मनीषा कुंभोजकर यांच्याकडून ठेवीदाखल रक्कम घेतली होती.
मात्र सदर ठेवीची परतफेड न केल्याने त्यांच्याविरोधात रवींद्र कुंभोजकर आणि मनीषा कुंभोजकर यांनी ग्राहक न्यायालयात धाव घेतली.
याप्रकरणी ग्राहक न्यायालयाने शाम जाधव यांना आदेश दिले होते. मात्र या आदेशाचे पालन शाम जाधव यांनी केले नाही त्यामुळे तक्रारदारांनी फौजदारी गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी न्यायालयाने सुनावणी करत रवींद्र गणेश कुंबोजकर यांना रु. ९२०६९६ रक्कम मुदत ठेव परत न केल्याबद्दल 3 वर्षे कारावास आणि रु. १००००० दंड अशी शिक्षा सुनावली आहे.