बेळगाव लाईव्ह :हे खूपच उत्साहवर्धक आहे की बेळगाव यावेळी आपल्या लोकसभा निवडणुकीच्या इतिहासातील सर्वाधिक मतदान झाल्याचे पाहणार आहे. कारण मतदान कालावधी समाप्त होण्यास तासभर असताना आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत बेळगावातील मतदानाची टक्केवारी मागील वर्षांच्या तुलनेत 65.67 टक्के जास्त झाली आहे.
बेळगाव लोकसभा मतदार संघातील विविध विधानसभा मतदारसंघांमध्ये आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत झालेल्या पाच टप्प्यातील मतदानाची टक्केवारी (अनुक्रमे सकाळी 9 वा., 11 वा., दुपारी 1 वा., 3 वा. व सायं. 5 वा. यानुसार) पुढील प्रमाणे आहे. बेळगाव लोकसभा मतदारसंघ (02) : अरभावी -9.76, 24.19, 41.23, 54.93, 67.08. बैलहोंगल -7.85, 21.60, 38.53. 53.22, 67.24. बेळगाव दक्षिण -10.31, 24.11, 38.81, 50.18, 60.27. बेळगाव ग्रामीण -11.16, 26.10, 43.90, 57.50, 70.40. बेळगाव उत्तर -10.15, 23.68, 37.97, 48.95, 58.53. गोकाक -10.48, 25.85, 41.33, 55.16, 65.14. रामदुर्ग -7.16, 21.78, 40.29, 54.56, 68.69. सौंदत्ती -8.12, 23.21, 42.31, 56.90, 70.85. या पद्धतीने पाचव्या टप्प्याअखेर एकूण सरासरी 65.67 टक्के मतदान.
यापूर्वीच्या लोकसभा निवडणुकांमधील बेळगावातील मतदानाची एकूण सरासरी टक्केवारी अनुक्रमे 2004 मध्ये 66.10 टक्के, 2009 मध्ये 54.75 टक्के, 2014 मध्ये 68.25 टक्के, 2019 मध्ये 66.59 टक्के आणि 2021 मध्ये 56.02 टक्के इतकी होती.