बेळगाव लाईव्ह :*बेळगाव लोकसभा मतदारसंघातील बेळगाव शहर परिसरातील विविध ठिकाणाच्या मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांनी मतदानासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविलेला पाहायला मिळत आहे.
बेळगाव लोकसभा मतदारसंघात मतदानाला सुरुवात झाली असून सकाळी नऊ पर्यंत 9.5 % टक्के मतदान झाले आहे. चिकोडी लोकसभा मतदार संघात 10.79% मतदान झाले आहे.
बेळगाव लोकसभा मतदारसंघात बेळगाव उत्तर 10. 15% बेळगाव दक्षिण10.31% आणि बेळगाव ग्रामीण 11.5%या शहरालगतच्या तिन्ही मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढला आहे. गोकाक 9.95% तर अरभावी 9.71%मतदान झाले असून बैलहोंगल 7.66% तर सौंदत्ती 8.12% आणि रामदुर्ग मध्ये सर्वात कमी 7.15% मतदान झाले आहे.
चिकोडी लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक 11.65% निपाणी मध्ये तर सर्वात कमी सकाळी 9 पर्यंत कुडची मध्ये 10.22 टक्के मतदान झाले आहे.
हनुमान नगर येथील मतदारसंघात महिला बालकल्याण विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, काँग्रेसचे उमेदवार मृणाल हेब्बाळकर आणि विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी तर सदाशिवनगर मध्ये खासदार मंगला अंगडी यांनी तर शहापूर येथील मतदान केंद्रात महाराष्ट्रकरण समितीचे उमेदवार महादेव पाटील यांनी 102 वर्षीय आई आणि कुटुंबासह मतदान केले.
कर्नाटक राज्यातील उत्तर कर्नाटकातील 14 जिल्ह्यात आज मंगळवारी मतदान होत आहे. यामध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत बेळगाव व चिक्कोडी लोकसभा मतदारसंघासाठी आज मंगळवार, दि. 7 मे रोजी मतदान होत आहे. सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत जिल्ह्यातील मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता येईल. दरम्यान उष्णतेच्या तडाख्याचा धसका घेत मतदारांनी सकाळीच मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान निवडणुकीसाठी ४५२४ मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. निवडणूक सुरळीत व्यवस्थित पार पडण्यासाठी 34 हजार कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.यामध्ये 24 हजार कर्मचारी आणि दहा हजार हे पोलीस व सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बेळगाव लोकसभा मतदारसंघात 13 उमेदवार रिंगणात आहेत तर चिकोडी लोकसभा मतदारसंघांमध्ये 18 उमेदवार आहेत जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात 41 लाख 5 हजार 225 मतदार आहेत बेळगावला 19 लाख 23 हजार 788 मतदार असून,चिकोडी मतदारसंघांमध्ये 17 लाख 61 हजार, 694 मतदार आहेत. कारवार लोकसभा मतदारसंघात बेळगाव जिल्ह्यातील खानापूर व कित्तूर मतदारसंघ जोडले आहेत. या दोन्ही विधानसभा मतदारसंघात मिळून चार लाख 19 हजार 743 मतदार आहेत.