Wednesday, January 1, 2025

/

भाजप महिलेवर अन्याय करणाऱ्याच्या पाठीशी नाही -अमित शाह

 belgaum

बेळगाव लाईव्ह:काँग्रेस आपल्या होट बँकेसाठी जनतेला संकटात टाकण्याचे काम करत आहे. बॉम्बे ब्लास्ट झाला तरी यांच्यात काही फरक पडलेला नाही. प्रल्हाद जोशी यांना घातलेले एक एक मत मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवेल. मोदींना पुन्हा पंतप्रधान केल्यास दहशतीचे संपूर्ण निर्मूलन होईल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले.

हुबळी येथे आयोजित प्रचार सभेमध्ये ते बोलत होते. प्रल्हाद जोशी दिसायला सिधेसाधे वाटत असले तरी हुबळी -धारवाडच्या विकासाचा विषय येतो त्यावेळी ते माझ्याशी देखील भांडतात. काँग्रेसवाले खोटे सांगून भाजपवर आरोप करत आहेत.

आचारसंहितेमुळे कर्नाटकला दुष्काळी निधी देण्यास विलंब झाला. परंतु आता तो निधी देण्यात आला असताना प्रज्वल रेवन्ना सीडीचे प्रकरण उद्भवले आहे. मी आत्ताही स्पष्टपणे सांगतो की कोणत्याही महिलेवर अन्याय करणाऱ्यांच्या पाठीशी भाजप कधीही थांबत नाही.

सिद्धरामय्या, डी. के शिवकुमार यांनी हे थोडं लक्षात घ्याव. कारण कारवाई तुम्हालाच करायची आहे. रेवन्ना प्रकरणी त्वरित कारवाई करण्याऐवजी राजकारण करत तुम्ही आरोपीला विदेशी जाऊ दिलत. तुमच्यात धाडस असेल तर सत्य जनतेसमोर मांडा. महिलेचे शोषण करण्याचे हीन कृत्य करणाऱ्याला कठोर शासन झाले पाहिजे. त्यात विलंब होता कामा नये असे आम्हाला वाटते. तथापी अशा भयानक अपराधाचे राजकीय भांडवल केले जात आहे, असे केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले.

नेहा हिरेमठ या मुलीचा 18 एप्रिल रोजी खून झाला, मात्र काँग्रेस नेते ती वैयक्तिक घटना असल्याचे सांगतात. तुम्हाला जमत नसेल तर सांगा आम्ही कर्नाटकला सुरक्षित करू. कर्नाटकातील मुलींना सुरक्षण देऊ असेही त्यांनी स्पष्ट केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.