Wednesday, January 15, 2025

/

अण्णासाहेब जोल्लेंच्या प्रचारार्थ गृहमंत्र्यांची काँग्रेसवर टीका

 belgaum

बेळगाव लाईव्ह : चिकोडी लोकसभा मतदार संघाचे भाजप उमेदवार अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रचारार्थ आज हुक्केरी येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत अमित शहा यांनी भाजपच्या आजवरच्या कारकिर्दीतील यशाचा पाढा वाचत काँग्रेसच्या अपयशावर शरसंधान साधले.

यावेळी बोलताना अमित शहा म्हणाले, रायबरेली लोकसभा मतदार संघातून सोनिया गांधींनी काँग्रेसची उमेदवारी राहुल गांधी यांना दिली परंतु हि उमेदवारी यशस्वी होणार नाही.

सोनिया गांधींनी २० वेळा चांद्रयान मोहीम ठरवली पण तीही कधी यशस्वी झाली नाही. अमेठीतून पळून जाऊन आता रायबरेलीत उमेदवारी दाखल केलेल्या राहुल गांधींचा निकाल मी आज याच ठिकाणावरून जाहीर करत असल्याचा दावा अमित शहा यांनी केला.

यावेळी हुक्केरी येथील जाहीर सभेत उशिरा पोहोचलेल्या अमित शहांनी उपस्थितांची दिलगिरी व्यक्त केली. यावेळी होलेम्मादेवी आणि सौंदत्ती यल्लम्मा देवीचे स्मरण करत आपल्या भाषणाची सुरुवात त्यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादनाही केले.

यावेळी अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा उचलून धरत त्यांनी पुन्हा काँग्रेस नेत्यांवर निशाणा साधला राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे यांना आमंत्रण देऊनही त्यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला उपस्थिती दर्शविली नाही. त्यांच्या वोटबँकेसाठी ते अयोध्येत आले नसल्याचा आरोप करत वोटबँकेची काळजी काँग्रेसला लागली असल्याचा टोला त्यांनी लगावला.

हुक्केरी येथे आयोजित भाजप अधिवेशनात आमदार निखिल कत्ती , खासदार अण्णासाहेब जोल्ले, आमदार शशिकला जोल्ले यांच्यासह भाजपचे अनेक नेते उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.