Friday, December 20, 2024

/

नैऋत्य रेल्वेची विशेष साप्ताहिक सेवा;

 belgaum

बेळगाव लाईव्ह :उन्हाळ्याच्या सुट्टीतील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी दूर करण्यासाठी नैऋत्य रेल्वेने आज गुरुवार दि 18 एप्रिलपासून येत्या 27 जुलै 2024 या कालावधीपर्यंत रेल्वे क्र. 01662/01661 राणी कमलापती -म्हैसूर -राणी कमलापती (भोपाळ) ही उन्हाळी साप्ताहिक विशेष रेल्वे सेवा सुरू केली आहे. विशेष म्हणजे ही रेल्वे सेवा म्हणजे शिर्डीला जाऊ इच्छिणाऱ्या बेळगाव परिसरातील प्रवाशांसाठी चांगली संधी आहे.

रेल्वे क्र. 01662 -राणी कमलापती (आरकेएमपी) ते म्हैसूर (एमवायएस) ही साप्ताहिक विशेष रेल्वे आज गुरुवार दि. 18 एप्रिलपासून येत्या 25 जुलैपर्यंत दर गुरुवारी प्रवासाला निघेल.

त्याचप्रमाणे रेल्वे क्र. 01661 -म्हैसूर ते राणी कमलापती ही साप्ताहिक विशेष रेल्वे शनिवार दि 20 एप्रिलपासून 27 जुलैपर्यंत दर शनिवारी प्रवासाला निघेल. निर्धारित कालावधीत या दोन्ही रेल्वे एकूण 15 फेऱ्या करतील. सदर रेल्वेची रचना 2 एलडब्ल्यूएलआरआरएम, 2 एलएस, 4 एलडब्ल्यूएससीएन, 4 एलडब्ल्यूएसीसीडब्ल्यू, 3 एलडब्ल्यूएसीसीएन, 7 एलडब्ल्यूएसीसीएनई असे एकूण 22 (एलएचबी कोचीस) अशी असणार आहे. सदर रेल्वे सेवा बेळगावला नसली तरी ती हुबळी येथे उपलब्ध असणार आहे.

सध्या उन्हाळ्याच्या सुट्टीला सुरुवात झाल्यामुळे रेल्वेंना गर्दी वाढली आहे. सुट्टीच्या मोसमात रेल्वेचे तिकीट मिळणे अवघड असते. या परिस्थितीत हुबळी, गदग, बागलकोट, कोपरगाव मार्गे जाणाऱ्या उपरोक्त रेल्वे सेवेमुळे बेळगाव परिसरातील शिर्डीला जाऊ इच्छिणाऱ्यांची चांगली सोय होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.