Wednesday, January 15, 2025

/

29 पासून बेळगाव मार्गे ऋषिकेशला विशेष रेल्वे सेवा

 belgaum

बेळगाव लाईव्ह :उन्हाळ्याच्या सुट्टीतील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी दूर करण्यासाठी नैऋत्य रेल्वेने आज सोमवार दि. 29 एप्रिलपासून येत्या 30 मे 2024 या कालावधीपर्यंत रेल्वे क्र. 06225/06226 हुबळी – ऋषिकेश – हुबळी ही उन्हाळी विशेष एक्सप्रेस रेल्वे सेवा दर सोमवारी व गुरुवारी सुरू केली आहे. बेळगाव मार्गे असलेल्या या रेल्वे सेवेमुळे ऋषिकेश (उत्तराखंड) या तीर्थस्थळाला जाऊ इच्छिणाऱ्या बेळगाव परिसरातील भाविकांची चांगली सोय झाली आहे.

रेल्वे क्र. 06225 हुबळी ते ऋषिकेश उन्हाळी विशेष एक्सप्रेस रेल्वेसेवा येत्या सोमवार दि 29 एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. सदर विशेष एक्सप्रेस रेल्वे येत्या 27 मे 2024 पर्यंत दर सोमवारी म्हणजे दि. 29, 6, 13, 20 व 27 मे रोजी हुबळीहून प्रवासाला निघेल.

त्याचप्रमाणे रेल्वे क्र. 06225 – ऋषिकेश ते हुबळी ही उन्हाळी विशेष एक्सप्रेस रेल्वेसेवा गुरुवार दि. 2 मे 2024 रोजी प्रारंभ होत आहे. ही रेल्वे येत्या 30 मे 2024 पर्यंत दर गुरुवारी म्हणजे दि. 2, 9, 16, 23 व 30 मे रोजी हुबळीहून प्रवासाला निघेल. निर्धारित कालावधीत या दोन्ही रेल्वे एकूण प्रत्येकी 5 फेऱ्या करतील. सदर रेल्वेची रचना 12-जीएससीएन, 02-एसीसीएन, 02-एसीसीडब्ल्यू, 02-एसएलआर/डी, 04 -जीएस असे एकूण 22 कोचीस अशी असणार आहे.

रेल्वे क्र. 06225 हुबळी ते ऋषिकेश उन्हाळी विशेष एक्सप्रेस रेल्वे येत्या सोमवारपासून 27 मेपर्यंत दर सोमवारी सायंकाळी 7:45 वाजता हुबळी येथून सुटेल. त्यानंतर धारवाड मार्गे रात्री 12:25 वाजता बेळगाव रेल्वे स्थानकावर पोहोचून 12:30 वाजता पुढे ऋषिकेशच्या दिशेने प्रस्थान करेल.

बेळगावसह घटप्रभा, मिरज येथे थांबे असलेली ही रेल्वे पुणे मार्गे बुधवारी सायंकाळी 6:45 वाजता ऋषिकेश येथे पोहोचेल. त्याचप्रमाणे परतीच्या मार्गावर रेल्वे क्र. 06225 – ऋषिकेश ते हुबळी ही उन्हाळी विशेष एक्सप्रेस रेल्वे येत्या गुरुवार दि. 2 मेपासून 30 मेपर्यंत दर गुरुवारी सायंकाळी 5:55 वाजता ऋषिकेश येथून सुटेल आणि शनिवारी दुपारी 2:25 वाजता बेळगाव रेल्वे स्थानकात दाखल होऊन 2:30 वाजता

हुबळीकडे रवाना होईल. हुबळी येथे ही रेल्वे सायंकाळी 5:30 वाजता पोहोचेल. एकंदर बेळगाव मार्गे असलेल्या या उन्हाळी विशेष एक्सप्रेस रेल्वे सेवेमुळे उत्तराखंड येथील ऋषिकेश या तीर्थस्थळी जाऊ इच्छिणाऱ्या बेळगाव परिसरातील भाविकांची चांगली सोय होणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.