Thursday, January 9, 2025

/

राज्याचा बारावीचा निकाल 84.59 टक्के; यंदाही मंगळूर प्रथम स्थानी

 belgaum

बेळगाव लाईव्ह :राज्याच्या शिक्षण खात्याने यंदाचा पदवी पूर्व द्वितीय वर्षाचा अर्थात बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर केला असून यंदाचा राज्याचा निकाल 84.59 टक्के इतका लागला आहे. या पद्धतीने मागील वर्षीच्या 78.97 टक्के निकालामध्ये 5.62 टक्क्यांनी सुधारणा झाली आहे.

यंदा सर्वाधिक शेकडा 97.37 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण होण्याद्वारे दक्षिण कन्नड अर्थात मंगळूर जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. चिक्कोडी आणि बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यांना मात्र अनुक्रमे 15 व्या व 27 व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे.

मागील वर्षी बारावीच्या परीक्षेत राज्यात प्रथम येणाऱ्या दक्षिण कन्नड (मंगळूर) जिल्ह्याने आपले हे स्थान यंदा देखील अबाधित राखले आहे. मागील वर्षी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी शेकडा 95.33 असणाऱ्या या जिल्ह्याची टक्केवारी यंदा 97.37 अशी सुधारली आहे.

दक्षिण कन्नड जिल्हा मागोमाग यंदा उडपी (96.80 टक्के) आणि विजयपूर (94.89 टक्के) या शैक्षणिक जिल्ह्यांनी राज्यात अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याचा बारावी परीक्षेचा निकालात यंदा मागील वर्षाच्या तुलनेत सुधारला असली तरी हा जिल्हा 27 व्या स्थानावर आहे.

मागील वर्षी बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींची एकूण टक्केवारी 73.98 टक्के इतकी होती जी यंदा 77.20 टक्के इतकी झाली आहे. मागील वर्षी 78.76 टक्के इतकी टक्केवारी असणाऱ्या चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्याची आपल्या टक्केवारीत 84.10 टक्के अशी सुधारणा करत राज्यात 15 वे स्थान मिळविले आहे.

राज्यातील विविध 32 शैक्षणिक जिल्ह्यांच्या बारावी परीक्षेच्या निकालाची टक्केवारी (अनुक्रमे शैक्षणिक जिल्ह्याचे नांव, यंदाची टक्केवारी, मागील वर्षाची टक्केवारी यानुसार) पुढील प्रमाणे आहे. दक्षिण कन्नड -97.37, 95.33. उडपी -96.80, 95.24. विजयपूर -94.89, 84.69. कारवार -92.51, 89.74. कोडगु -92.13, 90.55.

बंगळूर दक्षिण -81.57, 82.3. बेंगळूर उत्तर -88.67, 82.25. शिमोगा -88.58, 83.13. चिक्कमंगळूर -88.20, 83.28. बंगळूर ग्रामीण -87.55, 83.04. बागलकोट -87.54, 78.79. कोलार -86.12, 79.2. हासन -85.83, 83.14. चामराजनगर -84.99, 81.92. चिक्कोडी -84.10, 78.76. रामनगर -83.58, 78.12. म्हैसूर -83.14, 79.89.

चिक्कबेळ्ळापूर -82.25, 77.77. बिदर -81.69, 78. तुमकुर -81.03, 74.5. दावणगिरी -80.96, 75.72. कोप्पळ -80.83, 74.8. धारवाड -80.70, 73.54. मंड्या -80.56, 77.47. हावेरी -78.36, 74.13. यादगिरी -77.29, 62.98. बेळगाव -77.20, 73.18. कलबुर्गी -75.48, 69.37. बेळ्ळारी -74.70, 69.55. रायचूर -73.11, 66.21. चित्रदुर्ग -72.92, 69.5. गदग -72.86, 66.91. राज्याची एकूण टक्केवारी : 84.59 (मागील वर्षी 78.97).

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.