Wednesday, September 18, 2024

/

पोलीसांसाठी बाल संरक्षण प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव जिल्हा बाल संरक्षण पोलीस विभाग, जिल्हा पोलीस प्रशासन आणि बेळगाव पोलीस आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आयोजित बाल संरक्षण प्रशिक्षण कार्यशाळा आज शुक्रवारी बीम्स सभागृहामध्ये शिस्तबद्धरीत्या पार पडली.

जिल्हा पोलीस अधीक्षक (एसपी) डॉ. भीमाशंकर गुळद यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यशाळेचे उद्घाटन व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते झाडाच्या रोपट्याला पाणी घालण्याद्वारे झाले. यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना एसपी डॉ. भीमाशंकर गुळद यांनी मुलांचे संगोपन व संरक्षणात आईची भूमिका महत्त्वाची असते.

पौगंडावस्थेत भरकटणाऱ्या मुलांचे प्रमाण अलीकडे वाढले आहे. त्यांना योग्य मार्गावर आणणे हे आई-वडिलांचे कर्तव्य आहे असे सांगून बालकांच्या सुरक्षेसाठी बाल संरक्षण पोलीस विभाग स्थापन करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

बाल संरक्षण अधिकारी महांतेश भजंत्री यांनी यावेळी बोलताना विजापूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील एका गावात बोअरवेलमध्ये पडलेल्या एका बालकाला 24 तासाच्या अथक प्रयत्नानंतर सुखरूप बाहेर काढण्यात आल्याची माहिती देऊन त्याबद्दल एनडीआरएफचे अभिनंदन केले. बाल न्याय मुलांची काळजी आणि संरक्षण कायदा 2000 च्या कलम 63 नुसार प्रत्येक जिल्ह्यात मुलांसाठी एक विशेष पोलीस शाखा स्थापन करण्याची सूचना केली आहे .

बाल संरक्षणाच्या दृष्टीने पोलीस व संबंधित कर्मचाऱ्यांसाठी असे प्रशिक्षण कार्यक्रम आवश्यक आहेत असे मत भजंत्री यांनी व्यक्त केले. आजच्या बाल संरक्षण प्रशिक्षण कार्यशाळेस पोलीस आयुक्त इडा मार्टिन मार्बनिंग, अप्पर पोलीस अधीक्षक व बाल रक्षण नोडल अधिकारी श्रुती एन. एस., डीसीपी व्ही. स्नेहा, एसीपी सदाशिव कट्टीमनी, मल्लाप्पा कुंदरगी आदींसह अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.