Thursday, January 9, 2025

/

मराठी भाषिकांनो जागृत व्हा!…अन् समितीच्या पाठीशी रहा

 belgaum

बेळगाव लाईव्ह:मराठी भाषिकांनो जागृत व्हा!… सार्वत्रिक निवडणुकांमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीची मते आतापर्यंत समितीलाच पडत होती. कारण आपल्या दुसऱ्या कोणत्या संकल्पना नसून केवळ मराठी भाषेत आणि मराठी भाषिकांचे हित हाच आपला अजेंडा आहे.

त्यामुळे कांही लोक मंदिर बांधूया, गटारी करूया, नदीचे पाणी आणून देतो, चंद्र आणून देतो सूर्य आणून देतो अशा वल्गना करत तुमच्याकडे नोटांची बंडल घेऊन येतील. मात्र त्यांच्या पाठीमागे तुम्ही लाचार होऊन फिरू नका. कारण गेली 67 वर्षाचा आमचा निष्ठेचा लढा, लोकांनी हुतात्मा होऊन रक्त सांडलेल आहे.

ते वाया न घालवण्याची जबाबदारी आपल्या हातात आहे. या सगळ्या गोष्टींच्या पाठीमागे त्या निष्ठा, परंपरा आणि इच्छा या असताना आपण केवळ तात्पुरत्या फायद्यासाठी कोणताही गैरमार्ग अवलंबू नका. समिती ही आपली आहे आपल्या माणसाने उभी केलेली आहे.

समितीचा उमेदवार हा आपल्यातून निर्माण झालेला आहे. त्यामुळे फक्त महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारालाच मतदान करणं हे आपलं कर्तव्य आहे. अन्यथा सीमा लढ्याला गालबोट लावण्याचे पाप आपल्याकडून घडेल.

महाराष्ट्र एकीकरण समितीने 2014 मध्ये केलेली चूक यावेळी पुन्हा करू नये : गेल्या 2014 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीने बऱ्यापैकी राष्ट्रीय पक्षांना सहकार्य करून मते मिळवून देण्याचे काम केले होते.Mes loksabha

यावेळी ती चूक न करता समितीने आपले बालेकिल्ले कसे शाबूत ठेवता येतील, आपली हॉट बँक कशी सुरक्षित राहील यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. तसे झाल्यास त्याची दखल राष्ट्रीय स्तरावर दिल्ली दरबारी घेतली जाईल हे ध्यानात घेतले पाहिजे.

यासाठी आपल्या मतांचा व्यवहार होणार नाही याची दक्षता घेत मराठी भाषिकांनी भक्कमपणे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीशी उभे राहावे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.