बेळगाव लाईव्ह: समितीच्या अस्तित्वाचा लढा जिंकावा लागणार आहे त्यामुळे मराठी भाषा आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी प्रत्येकाने जबाबदारी घ्यावी असे प्रतिपादन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सर चिटणीस मालोजी अष्टेकर यांनी केले आहे.
कारवार लोकसभा मतदार संघातील समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई यांच्या खानापूर येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन रविवारी सीमा सत्याग्रही शंकर पाटील, मध्यवर्ती समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, तालुका समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई आदींच्या उपस्थितीत करण्यात आले.
तसेच हुतात्म्यांच्या व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी अष्टेकर यांनी बेळगाव आणि चिकोडी लोकसभा मतदार संघापेक्षा कारवार लोकसभा मतदारसंघात मराठी भाषिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे सर्वांनी प्रयत्न केल्यास समितीला विजय मिळणार आहे.
निरंजन सरदेसाई हे अभ्यासू कार्यकर्ते आहेत त्यांच्या माध्यमातून तालुक्यात पुन्हा एकदा समितीला बळकटी मिळेल असा विश्वास व्यक्त केला.
माजी आमदार मनोहर किणेकर यानी बेळगाव आणि कारवार लोकसभा मतदारसंघातून समितीने निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहेत्यामुळे दोन्ही ठिकाणी समितीला यश मिळणार असून येणाऱ्या काळात पुन्हा एकदा समितीची ताकद निर्माण झाल्याचे दिसून येईल.
युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, युवा नेते शुभम शेळके, मारूती परमेंकर, विलास बेळगावकर, बाळासाहेब शेलार, गोपाळ पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

उमेदवार सरदेसाई मराठी भाषेच्या रक्षणासाठी आपण सदैव कार्यरत राहणार असून सीमाप्रश्नाची सोडवणूक होई तो पर्यंत समितीच्या झेंड्याखाली लढा देत राहणार आहे. कारवार लोकसभा मतदारसंघासाठी विकासाच्या आराखडा तयार केला आहे तसेच खानापूर येथे वेगवेगळे उद्योगधंदे यावेत आणि रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची माहिती दिली.
हलगा ग्राम पंचायत सदस्य रणजीत पाटील यांनी प्रास्ताविक केले तर सीताराम बेडरे यांनी सूत्र संचालन केले.
यावेळी ऍड एम जी पाटील, विकास कलघटगी, नंदगड विभाग प्रमूख रमेश धबाले, नागेश भोसले, मुकुंद पाटील, जगन्नाथ देसाई, सिताराम बेडरे, प्रतापराव देसाई, के एम घाडी, खानापूर समितीचे उपाध्यक्ष मारुती गुरव, चंद्रकांत देसाई, अमृत शेलार, पुंडलिक पाटील, परशुराम पाटील, मोहन कुलम, नगरसेवक विनोद पाटील, प्रभू कदम, संदेश कोडचवाडकर, अशोक पाटील, अजित पाटील, भूषण सरदेसाई, पूडलिक पाटील, राजाराम देसाई, अभिजित सरदेसाई यांच्यासह समितीचे कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते




