बेळगाव लाईव्ह : बेळगाव सह सीमा भागात मराठी भाषेचा अस्तित्व टिकवायचं असेल तर आगामी लोकसभेत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मराठा उमेदवाराला मतदान करा असे आवाहन श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडूस्कर यांनी केले आहे.
बेळगाव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर होताच उमेदवार महादेव पाटील आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने रमाकांत कोंडूस्कर यांची भेट घेऊन श्रीराम सेना हिंदुस्तानचा देखील पाठिंबा मिळवला.
महाराष्ट्र एकीकरण समितीने उमेदवार देऊ नये याबाबतीत मराठी भाषिकांनी कोणताही संभ्रम बाळगू नये कारण मराठी भाषेवर जो वरवंटा फिरवला जात आहे मराठी भाषिकांना टारगेट केलं जात आहे मराठी भाषिकांना भूमिहीन केलं जात आहे जमिनी बळकावल्या जात आहेत.
मराठी भाषिकांना तोकड्या नजरेने पाहिलं जात आहे या सर्वाचा विरोध करण्यासाठी आणि दोन्ही राष्ट्रीय पक्षांना आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी निवडणूक गरजेची आहे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी विकास कलघटगी गुणवंत पाटील सागर पाटील कपिल भोसले मुकेश बारदेस्कर आदी उपस्थित होते. मराठी स्वाभिमान आणि मराठी भाषेसाठी राष्ट्रीय पक्षातील मराठी भाषिकांनी देखील समितीच्या पाठीशी उभा राहावं असा आव्हान यावेळी करण्यात आले.
महादेव पाटील यांनी गेल्या 51 वर्षात मराठी भाषा आणि महाराष्ट्र एकीकरण समितीसाठी केलेल्या कामाची पोचपावती म्हणजेच त्यांना मिळालेली ही लोकसभेची उमेदवारी आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत महादेव पाटील हे मराठी भाषिकांचे प्रतीक आहेत त्यामुळे मराठी म्हणून मराठी भाषिकांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीशी राहून आपलं अस्तित्व दाखवण्याची ही शेवटची वेळ असल्याचे यावेळी सांगण्यात आले.