बेळगाव लाईव्ह :बेळगाव जिल्हा स्वीप समितीच्यावतीने आयोजित मतदान जनजागृती पदयात्रेचा आज मंगळवारी सकाळी जिल्हा स्वीप समितीचे अध्यक्ष व जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांच्या हस्ते किल्ला येथील दुर्गादेवी मंदिराच्या प्रांगणात हिरवा बावटा दाखवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्यांनी जनतेला गुलाबाचे फूल देऊन अनिवार्यपणे मतदान करण्याची विनंती केली.
पदयात्रेचा शुभारंभ केल्यानंतर बोलताना जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) राहुल शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीत सर्व मतदारांनी मतदान करणे आवश्यक आहे. प्रत्येकाने 100 मतदान वाढीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले. सध्या स्वीप समितीच्या माध्यमातून मतदारांमध्ये मतदान जागृती करण्यात येत आहे.
आजच्या पदयात्रेवेळी संगोळ्ळी रायण्णा बी.ई.डी महाविद्यालयाच्या प्रशिक्षणार्थींनी मतदारांना कापड देऊन त्यांच्यात मतदानाबद्दल जागृती केली. लोकसभा निवडणुकीत सर्व मतदारांनी सक्तीने मतदान करावे असे आवाहन यावेळी करण्यात येत होते.
जथेचा कार्यक्रम अर्थात मतदान जनजागृती पदयात्रा शहरातील श्री दुर्गा देवी मंदिर किल्ला येथून मध्यवर्ती बसस्थानक, खडेबाजार, शनिवारी खुट, काकतीवसे रोड मार्गे चन्नम्मा सर्कलपर्यंतच्या मार्गावर पार पडली. चन्नम्मा सर्कल येथे सक्तीच्या मतदान जनजागृतीसाठी प्रशिक्षणार्थींनी मानवी साखळी केली.
संगोळ्ळी रायण्णा बी.ई.डी कॉलेजचे सुमारे 200 प्रशिक्षणार्थी, जीपीएम अधिकारी व कर्मचारी यांनी यावेळी हातातील फलकांद्वारे जनजागृती करण्याबरोबरच करपत्रकांचे वितरण आणि व्हॉइस एन्लार्जमेंटच्या (जिंगल्स) माध्यमातून अनिवार्य मतदानाबद्दल व्यापक जनजागृती केली.
याप्रसंगी सहाय्यक जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, जि. पं. नियोजन संचालक तथा जिल्हा स्वीप नोडल अधिकारी डॉ. एम. कृष्णराजू, मुख्य नियोजन अधिकारी गंगाधर दिवातारा, जिल्हा निवडणूक खर्च नोडल अधिकारी शंकरानंद बनशंकरी, लेखापाल गंगा हिरेमठ, जिल्हा आय.ई.सी समन्वयक प्रमोदा गोदेकर, संगोळ्ळी रायण्णा बी.ई.डी. महाविद्यालयाचे प्राचार्य बी. जी. धारवाड, सहाय्यक व्याख्याते एन. एस. जाधव, जी. आर. कोटेनावर आदी उपस्थित होते.