बेळगाव लाईव्ह : बेळगाव लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून मृणाल हेब्बाळकर यांनी निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला.
उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार, बेळगावचे जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बालकल्याण विकास विभाग मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार प्रकाश हुक्केरी, लक्ष्मण सवदी, अशोक पट्टण, विश्वास वैद्य, राजू सेठ, राजू कागे, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, आदींच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज सादर करण्यात आला.
बेळगाव लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक लढविणार मृणाल हेब्बाळकर यांचे वय ३१ असून त्यांनी बेळगावच्या जीआयटी कॉलेजमधून बीई पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे.
अनेकविध व्यवसायाची धुरा ते सांभाळत असून त्यांच्या नावावर १५ कोटीहून अधिक रुपयांच्या मालमत्तेची नोंद आहे.
तर १० कोटी रुपयांहून अधिक रकमेचे दायित्व नोंद आहे. त्यांच्यावर अद्याप कोणत्याही प्रकारची केस दाखल नसल्याचे निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या माहितीत जाहीर करण्यात आले आहे.