बेळगाव लाईव्ह :बेळगाव जवळील बसवन कुडची गावची ग्रामदैवत श्री कलमेश्वर वार्षिक यात्रेनिमित्त खिलार बैलजोडींचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
मुख्यता करून पूर्व सांगली भागात पैदास असणारी जातिवंत समजली जाणारी खिलार जातीचं प्रदर्शन बसवन कुडची येथे पाहण्याची संधी जाणकारांना मिळाली. अतिशय देखणे कोचेरी शिंगाचे, पुष्ट वशिंडाचे हरणासारख्या धावेचे आणि घोड्यासारख्या खुराचे देखणे बैल बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
बैल क्षेत्रातील एक नामवंत जात बघण्याची संधी बसवण कुडची वासियांना मिळाली. खिलार जात मुख्यता शेतकाम व शर्यतीसाठी प्रसिद्ध आहे आणि सध्या शर्यतीचा मोसम असल्याने खिलार जातीच्या जनावरांना वाढती मागणी आहे.
शुद्ध खिलार जात बैलांची किंमत लाखाच्या पुढे असते अतिशय जातीवंत समजणारी अशी ही जनावरांची जात शेतकरी वर्गात शर्यत प्रेमीत खूप प्रसिद्ध आहे.
देखणे पणात अव्वल असणाऱ्या या बीजाचे संगोपन करणे जतन करणे गरजेचे आहे. भारतात बैलांच्या ज्या महत्त्वाच्या जाती समाजल्या जातात त्यात खिलार ही जात नंबर वन वर आहे त्यामुळे महाराष्ट्राची शान असणारी या जातीचे पैदास संवर्धन आणि जोपास देखील करणे गरजेचे आहे.