Sunday, January 5, 2025

/

पुन्हा रंगणार जारकीहोळी विरुद्ध हेब्बाळकर वाकयुद्ध?

 belgaum

बेळगाव लाईव्ह:गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांनी बेळगाव ग्रामीण मतदार संघामध्ये लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या विरोधात भाजप उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी 5 कोटी रुपये खर्च करणार असल्याची जाहीर घोषणा केली होती. त्यावेळी लक्ष्मी हेब्बाळकर मोठ्या मत फरकाने विजयी झाल्या असल्या तरी हेब्बाळकर आणि जारकीहोळी यांच्यातील हाडवैर आजही सुरूच राहिले.

आता मात्र रमेश जारकीहोळी हे काँग्रेस उमेदवार व हेब्बाळकर यांचे चिरंजीव मृणाल यांना पराभूत करून मागील वचपा काढण्यासाठी चुपचाप शांतपणे भाजप उमेदवार जगदीश शेट्टर यांच्या बाजूने कामाला लागले आहेत तर शेट्टर विजयी व्हावेत यासाठी रमेश आपले बंधू अरभावीचे आमदार भालचंद्र जारकीहोळी यांच्या साथीने फक्त आपल्याच मतदारसंघांमध्ये नव्हे तर इतर मतदारसंघांमध्ये देखील आपल्या प्रभावाचा वापर करत आहेत. रमेश जारकीहोळी आणि शेट्टर यांनी गेल्या मंगळवारी विद्यमान खासदार मंगला अंगडी यांच्या बेळगाव येथील निवासस्थानी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या.

सूत्रांच्या माहितीनुसार बैठकीचा विषय मराठा मतांना आमिष दाखविणे आणि कांही असंतुष्ट काँग्रेस नेत्यांना गाठणे हा होता. शेट्टर आणि जारकीहोळी यांनी कांही भागात संयुक्त प्रचार करण्याची योजना देखील आखली आहे. विशेष म्हणजे रमेश जारकीहोळी आतापर्यंत हेबाळकर आणि त्यांच्या मुलाच्या विरोधात एकही शब्द बोललेले नाहीत.

भाजप सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रमेश जारकेहोळी यांच्या शांत राहण्यामागे डावपेच आहे. त्यांना त्यांच्या वक्तव्यातून परिस्थिती भाजपच्या विरोधात करायची नाही आहे. तथापि ती कमतरता हेब्बाळकर यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देऊन भालचंद्र जारकीहोळी भरून काढत आहेत.

एकेकाळी चांगले मित्र असलेल्या रमेश जारकीहोळी आणि लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यामधील हाडवैराला 2018 मधील पीएलडी बँकेच्या निवडणुकीदरम्यान प्रारंभ झाला. तेंव्हापासून दोघांमधील वैर एकमेकांवर राजकीय आणि वैयक्तिक आरोप -प्रत्यारोप करण्याच्या माध्यमातून आजतागायत सुरूच आहे.Politics

‘सेक्स फॉर जॉब’ स्कॅन्डल (अश्लील सीडी) प्रकरणात सापडून रमेश यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोघामधील वैर आणखीनच वाढले. डी. के. शिवकुमार आणि हेब्बाळकर यांनी आपल्याला या स्कॅन्डलमध्ये अडकवण्याचा कट रचल्याचा आरोप त्यावेळी रमेश यांनी केला होता.

आता लोकसभा निवडणूक रिंगणातील रमेश जारकेहोळी यांच्या सक्रियतेबद्दल प्रतिक्रिया देताना हेब्बाळकर यांचे बंधू चन्नराज हट्टीहोळी म्हणाले की, जे षड्यंत्र रचून आम्हाला दडपण्याचा प्रयत्न करतील त्यांना जनता उत्तर देईल. विधानपरिषद निवडणुकी वेळी देखील बऱ्याच गुप्त बैठका घेऊन त्यांनी हेच करण्याचा प्रयत्न केला होता. तथापि लोकांनी आमच्या परिवाराला आणि काँग्रेसला पाठिंबा दिला. या निवडणुकीचा निकालही तसाच लागेल. आम्ही निवडणूक शांततेने लढवू इच्छितो.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.