बेळगाव लाईव्ह : अलीकडे राजकारणात चहा यावरून चर्चा होताना दिसते. बेळगाव जिल्ह्याच्या राजकारण देखील चहा चाय हा विषय चर्चेत येताना दिसत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पूर्वीच्या विकत होते तेव्हापासून चहाचा मुद्दा राजकारणात चर्चिल जाऊ लागला. त्यानंतर भाजपच्या नेते मंडळींनी चाय पे चर्चा सुरू केली. बेळगाव लोकसभेमध्ये मतदारसंघात चहा विकणारे महादेव पाटील यांना देखील महाराष्ट्र एकीकरण समितीची उमेदवारी मिळाली आणि आज सतीश जारकीहोळी आणि काँग्रेसचे प्रभारी रणदीप सुरजेवाला यांन बेळगावच्या राजकारणावर चाय पे चर्चा केली.
कर्नाटक राज्य काँग्रेस प्रभारी रणदीप सिंग सुरजेवाला यांनी आज बेळगावमध्ये येऊन येथील काँग्रेस भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत भाजप विरुद्ध जोरदार टीका केली.
पत्रकार परिषदेनंतर सुरजेवाला यांनी स्थानिक नेते लक्ष्मण सवदी, गणेश हुक्केरी, अशोक पट्टण, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्याशी हितगुज साधले. तसेच त्यानंतर जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्यासोबत खाजगीत रहस्यपूर्ण चर्चा केली. कर्नाटकचे प्रभारी सुरजेवाला यांनी चहाचा आस्वाद घेत ही चर्चा केली.
आतापर्यंत भाजपमध्ये चाय पे चर्चा होताना पाहण्यात आले होते, मात्र आज काँग्रेस भवनमध्ये चाय पे चर्चा सुरू होती. त्याचप्रमाणे काँग्रेस भवन मधून निघताना सुरजेवाला हे रामदुर्गचे आमदार अशोक पट्टण यांच्याशी देखील खाजगीत चर्चा करताना दिसले. विशेष म्हणजे आज काँग्रेस भवन येथे नेतेमंडळी गटागटाने चर्चा करताना पाहायला मिळाली.
यावेळी रणदीपसिंह सुरजेवाला यांनी ईस्ट इंडिया कंपनीशी भाजपाची तुलना केली. भाजप हा कर्नाटकात कन्नडविरोधी भूमिका ठेवून काम करत आहे, असे ते म्हणाले. कर्नाटकातील दुष्काळाचा मुद्दा उपस्थित करत सुरजेवाला यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर राज्याच्या दुष्काळाची घोषणा नाकारल्याबद्दल आणि नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फंड मधील निधी रोखल्याबद्दल टीका केली. सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतरही भाजप सरकारने एकूण 58,000 कोटी रुपये देण्यास विलंब केला आहे, भाजपने कर्नाटकातील जनतेला मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवण्याचा डाव आखल्याचे आरोपही सुरजेवाला यांनी केले.
यावेळी भाजपने देशाला कर्नाटकाला काय दिले हे सांगण्यासाठी पत्रकार परिषदेत रिकामे चंबू प्रदर्शित करत भाजपावर उपहासात्मक टीका केली. येत्या २८ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा बेळगाव दौरा आयोजिण्यात आला असून यादरम्यान ‘गो बॅक मोदी, गो बॅक अमित शाह’ अशा घोषणा देऊन कर्नाटकाच्या जनतेच्या वतीने निषेध व्यक्त केला.