Saturday, November 16, 2024

/

घरपट्टी चलन वितरण अखेर सुरू; मात्र ऑनलाइन उपलब्धता नाही

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरवासीय जे 1 एप्रिलपासून मालमत्ता कर भरण्याची आतुरतेने वाट पहात होते त्यांना अनिश्चिततेचा सामना करावा लागत आहे.

कारण ऑनलाइन प्रणाली सुरू करताना तांत्रिक अडचणी येत आहेत. संकेतस्थळावर घरपट्टी चलन अद्याप उपलब्ध होत नसले तरी महापालिकेच्या विभागीय महसूल कार्यालयात मात्र थेट चलन उपलब्ध करून दिले जात आहे.

ऑनलाइन अर्थात संकेतस्थळावर चलन उपलब्ध करून देण्यात कोणती अडचण आहे? याबाबतची नेमकी माहिती मात्र उपलब्ध होऊ शकली नाही. ऑनलाइन घरपट्टी भरणाऱ्यांची संख्या जास्त आहे. पेटीएमच्या माध्यमातूनही महापालिकेकडून घरपट्टी भरून घेतली जाते.

त्यासाठी घरपट्टीचे चलन ऑनलाईन उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. गेल्या शनिवारपासून महापालिका कार्यालयात चलन वितरण करण्यात येत होते. घरपट्टीवरील 5 टक्के सवलत ही केवळ एप्रिल महिन्यातच दिली जाते. त्यामुळे 1 एप्रिल पासूनच घरपट्टी चलनात सवलत मिळावी यासाठी मिळकतधारक प्रयत्नशील असतात. तथापि यंदा महापालिकेच्या महसूल विभागाला 1 ते 4 एप्रिल या काळात चलन उपलब्ध करून देता आले नाही.

त्यामुळे ऑफलाइन चलनासाठी मिळकतधारांना आता महापालिकेच्या विभागीय कार्यालयाला भेट द्यावी लागणार आहे. कारण सध्या पेटीएमसह पैसे भरण्याचे सर्व ऑनलाईन पर्याय तांत्रिक बिघाडामुळे अनुपलब्ध आहेत.

मालमत्ता कर भरण्यासाठीची महापालिकेची अधिकृत वेबसाईट https://belagavicitycorp.org, ही असून जी सध्या बंद आहे. तथापि ती लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.