बेळगाव लाईव्ह : चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार प्रियंका जारकीहोळी यांनी आज चिक्कोडी सहायक आयुक्त कार्यालयात, निवडणूक अधिकारी राहुल शिंदे यांच्याकडे अत्यंत साधेपणाने आपला उमेदवारी अर्ज सादर केला.
बेळगावच्या राजकारणातील किंगमेकर समजले जाणारे सतीश जारकीहोळी यांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणात प्रवेश केलेल्या प्रियांका जारकीहोळी यांनी कोणताही गाजावाजा न करता आपला उमेदवारी अर्ज सादर केला.
कित्तूर कर्नाटक भागातून अत्यंत साधेपणाने उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा पहिला मान मिळविलेल्या प्रियंका जारकीहोळी यांनी आपले वडील मंत्री सतीश जारकीहोळी यांचा मार्ग अनुसरत साधेपणाची साक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
प्रियांका जारकीहोळी यांनी साधेपणात सादर केलेल्या उमेदवारी अर्जामुळे नागरीकांच्या मनावर नक्कीच छाप पडली आहे. प्रियंका यांच्यासमवेत सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, विधान परिषद सदस्य, दिल्लीचे विशेष प्रतिनिधी प्रकाश हुक्केरी, आमदार लक्ष्मण सवदी, गणेश हुक्केरी, राजू कागे, महेंद्र तमन्नावार, विश्वास वैद्य, आसिफ (आरजी) आणि महांतेश कौजलगी, बाबा साहेब पाटील, युवा नेते राहुल जारकीहोळी आदींच्या उपस्थितीत अर्ज दाखल करण्यात आला.
उमेदवारी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया संपेपर्यंत माजी मंत्री वीरकुमार पाटील, ए.बी.पाटील, माजी आमदार काकासाहेब पाटील, श्याम घाटगे, बेळगाव जिल्हा ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष विनय नवलगट्टी, उत्तम पाटील, चिक्कोडी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, केपीसीसीचे सरचिटणीस महावीर मोहिते, डॉ. उत्तम पाटील आदींसह अनेक नेते चिकोडी सहायक आयुक्तांच्या कार्यालयासमोर पाठिंबा देण्यासाठी उभे होते.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मंत्री सतीश जारकीहोळी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, कि चिक्कोडी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार प्रियंका जारकीहोळी यांच्या बाजूने जनतेचा कौल आहे. पण त्या किती मतांच्या फरकाने विजयी होतील याचा अंदाज आता काढता येणार नाही.
उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराला सुरुवात करू, असे मी यापूर्वी सांगितले होते. त्याचप्रमाणे आजपासून दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराला सुरुवात करत आहे. चिक्कोडी मतदारसंघात काँग्रेस समर्थक वातावरण असून जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे जारकीहोळी म्हणाले.