बेळगाव लाईव्ह:तुम्मरगुद्दी बस स्टॅन्डसह शहरातील शिवतीर्थ कॉलनी आणि अनगोळ येथे मटका घेणाऱ्या एकूण तीन मटका बुकिंना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या जवळून एकूण रोख रुपये 5120, मटक्याच्या चिठ्ठ्या व बॉलपेन जप्त करण्यात आले आहे.
कणबर्गी रोडवरील शिवतीर्थ कॉलनी येथे काल गुरुवारी माळ मारुती पोलिसांनी छापा टाकून एका मटका बुकिंग अटक केली. त्याच्याजवळून 2000 रुपये रोख आणि मटक्याचे साहित्य जप्त करण्यात आले.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नांव रविचंद्र शिवानंद कुरबर (वय 30, रा. नेगिनहाळ ता. बैलहोंगल) असे आहे. रविचंद्र हा शिवतीर्थ कॉलनी परिसरात मटका घेत असल्याचे समजताच माळ मारुती पोलिसांनी छापा टाकून त्याला रंगेहात पकडले. दुसऱ्या प्रकरणात तुम्मरगुद्दी बस स्थानकाच्या ठिकाणी मटका घेणाऱ्या एका मटका बुकिला मारीहाळ पोलिसांनी काल गुरुवारी अटक केली. तसेच त्याच्याकडील 2260 रुपये रोख व मटक्याचा चिठ्ठ्या जप्त करण्यात आल्या.
अटक केलेल्या आरोपीचे नांव रामप्पा शिवाप्पा बडनायक (वय 48, रा. तुम्मरगुद्दी) असे आहे. या खेरीज टिळकवाडी पोलिसांनी मारुती गल्ली अनगोळ येथे मटका घेणाऱ्या एका मटका बुकिंग अटक करून त्याच्याकडील रोख 860 आणि मटक्याचे साहित्य जप्त केले .
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव किरण कृष्णा पांडूजे (वय 33, रा. मारुती गल्ली अनगोळ) असे आहे. या सर्व प्रकरणी कर्नाटक पोलीस कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला असून पुढील तपास जारी आहे. उपरोक्त कारवाईबद्दल बेळगाव शहर पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांनी संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि कारवाई सहभागी पोलीस कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना शाबासकी दिली आहे.